Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआम. शिवाजीराव पाटील यांच्या प्रेरणेने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने.- शैक्षणिक...

आम. शिवाजीराव पाटील यांच्या प्रेरणेने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने.- शैक्षणिक साहित्याचे वाटप.🛑चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत व्यंकटरावच्या अथर्व व सिमरन या विद्यार्थ्यांची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड.🛑मुंबईत हक्काच्या घरासाठी आरपारची लढाई करणार — काँ. धोंडीबा कुंभार.🛑न्यु इंग्लिश स्कूल पाल ता.भुदरगड येथील शाळेत.- शालेय साहित्य वाटप.

🛑आम. शिवाजीराव पाटील यांच्या प्रेरणेने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने.- शैक्षणिक साहित्याचे वाटप.
🛑चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत व्यंकटरावच्या अथर्व व सिमरन या विद्यार्थ्यांची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड.
🛑मुंबईत हक्काच्या घरासाठी आरपारची लढाई करणार — काँ. धोंडीबा कुंभार.
🛑न्यु इंग्लिश स्कूल पाल ता.भुदरगड येथील शाळेत.- शालेय साहित्य वाटप.

💥आम. शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या प्रेरणेने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने.- शैक्षणिक साहित्याचे वाटप.

चंदगड.- प्रतिनिधी.

कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था, नवी मुंबई व अंकुश सोनावणे मित्र मंडळ, ऐरोली, नवी मुंबई या दोन्ही सामाजिक संस्थांच्या वतीने व चंदगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आम. शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या प्रेरणेने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने सोमवार, दि. ३०/०६/२०२५ ते बुधवार दिनांक ०३/०७/२०२५ असे चार दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यामधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये चांगल्या प्रतीच्या स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, रबर, शॉपर्नर इ. वस्तुंचे वाटप करण्यात आले.
मुंबईत राहूनही आपल्या मातीशी नाळ जोडलेली ठेवत गरजूंसाठी पुढाकार घेणे हेच कोल्हापूरकर संस्थेचे ब्रिद आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात चंदगड तालुक्यातील सुळये, ता. चंदगड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेपासून सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी सर्वप्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.
या उपक्रमात चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण, चंदगड पोलीस ठाणे स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, शिक्षणाधिकारी वैभव पाटील व नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अंकुश सोनवणे, कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष डी. एल. भादवणकर, सचिव प्रकाश तेजम, खजिनदार रणधीर पाटील, कार्याध्यक्ष विशाल पाटील, उपाध्यक्ष मारुती अर्दाळकर, सल्लागार मनोहर पाटील, अर्जुन पाटील, उपखजिनदार अभिजीत पुजारी, सदस्य योगेश मुळीक, उत्तम भादवणकर, विजय सुर्वे, सागर शेळके, शुभम भादवणकर आणि समाजसेवक अंकुश सोनवणे यांचे सहकारी मित्र मंडळी उपस्थित होते. तसेच या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये माननीय आमदार श्री.पाटील (भाऊ) यांचे खंदेसमर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहकार्य केले. या संपुर्ण शैक्षणिक उपक्रमाला संबंधित गावांमधील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती कमिटी अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, सदर शाळांमधील मुख्याध्यापक व इतर शिक्षक सहकारी आणि गावकऱ्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

संस्थेचे कार्य केवळ शालेय साहित्य वाटपा पुरते मर्यादित नसून शिक्षण आरोग्य आणि सामाजिक विकास या तीन महत्त्वाच्या दिशेने सातत्याने पुढे चाललेले आहे ते पुढे जात राहील
या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी ,ज्यांनी आमच्या संस्थेला सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून संस्थेच्या वतीने आम्ही आभारी आहोत वेळोवेळी असे सहकार्य लाभो हीच अपेक्षा. सर्वांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

🛑चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत व्यंकटरावच्या अथर्व व सिमरन या विद्यार्थ्यांची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड.

आजरा.- प्रतिनिधी.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती पंधरवडा निमित्त जिल्हा परिषद कोल्हापूर व पं .स. आजरा शिक्षण विभागाकडून तालुकास्तरावर निबंध ,वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील एकूण ११ केंद्रातील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हा स्तरासाठी निवड करून त्यांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.. यावेळी विलास पाटील शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.आजरा, सुभाष विभुते केंद्रप्रमुख, रावसाहेब देसाई केंद्रप्रमुख, माळी सर, संजीव देसाई -मुख्याध्यापक पंडित दीनदयाळ हायस्कूल व वरील स्पर्धांचे परीक्षक उपस्थित होते.


या स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजराचे जिल्हास्तरासाठी निवड झालेले (इयत्ता आठवी ते बारावी )या गटातील यशस्वी विद्यार्थी..
वक्तृत्व स्पर्धा कुमारी सिमरन भिकाजी पाटील,( इयत्ता दहावी) आजरा तालुक्यात प्रथम, जिल्हास्तरीय निवड..
चित्रकला स्पर्धा अथर्व शांताराम नाईक.. (इयत्ता आठवी. ) आजरा तालुक्यात प्रथम व जिल्हास्तरीय निवड..
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ प्राचार्य एम एम नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.. व कलाशिक्षक कृष्णा दावणे, व्ही एच गवारी व वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

🛑मुंबईत हक्काच्या घरासाठी आरपारची लढाई करणार — काँ. धोंडीबा कुंभार.

आजरा.- प्रतिनिधी.

मुंबईत गिरणी कामगारांना मोफत हक्काचे घर मिळावे यासाठी २००८ पासून सर्व श्रमिक संघटना च्या माध्यमातून सातत्याने मोर्चे आंदोलने सुरु असून उद्या च्या नऊ जुलै रोजी आझाद मैदानात आरपार ची लढाई करणार असलेचे काँ.धोंडिबा कुंभार यांनी व्यक्त केले.आजरा येथील गिरणी कामगार आँफीस मध्ये झालेल्या बैठकीत सुरवातीला प्रास्ताविक नारायण भंडागे यानी केले यावेळी कुंभार यानी मुंबईतील एकून चौदा संघटना एकत्र येत असून ऊद्याच्या येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका नगरपरिषदा व जिल्हा परीषद अशा वेळी शासनाला आमच्या हक्काची घरे देण्यासाठी भाग पाडू मराठी भाषेवर हिन्दी सक्ती करणारे सरकार जनतेचा रोष पाहून जी आर रद्द करू शकते. तर कायदेशीर तरतूद केलेल्या जमीनी हक्काने मिळवण्यासाठी सर्व गिरणीकामगार वारसदार यानी मोठ्या संख्येने ऊपस्थीत राहण्याचे आवाहन केले यावेळी कांँ.शांताराम पाटील कांँ. गोपाळ गावडे काँ. संजय घाटगे यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाबू केसरकर, नारायण राणे, निवृत्ती मिसाळे, हिंदूराव कांबळे याच्या सह गावागावातील शाखाप्रमुख उपस्थित होते आभार मनप्पा बोलके यानी मांनले.

🛑न्यु इंग्लिश स्कूल पाल ता.भुदरगड येथील शाळेत.- शालेय साहित्य वाटप..

गारगोटी.- प्रतिनिधी.

न्यु इंग्लिश स्कूल पाल ता.भुदरगड येथील शाळेत सदगुरू रामानंद महाराज सेवा संस्था हणबरवाडी गारगोटीचे वतीने व श्री शिवानंद महाराज हणबरवाडी गारगोटी मठाचे अध्यक्ष व मठाधिपती यांचेकडून शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पोलिस पाटील सहदेव डवरी पाल, सरपंच सौ.सुशिला सुधीर गुरव पाल, तंटामुक्ती अध्यक्ष विलास पाटील, अशोक जाधव, नांगरगाव विद्यामंदिर शाळा कमेटीचे अध्यक्ष सचिन मेटल नांगरगाव, सुनील तानवडे, सरपंच विलास पाटील,मा.पो.पाटील ही.भ.प. दत्तात्रय सावंत महाराज गारगोटी, शिंदेवाडी, हणबरवाडी, राम पांढरे, मुख्याध्यापक एस.एन.पाटील सर, दयानंद अकोलकर, तवंदकरसर, मानेसर, सहशिक्षिका सौ.शामल हसुरकर, शिपाई श्री सावंत,सौ.सारीका गुरव, ह.भ.प. आनंदराव पाडळकर, व सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.