🛑 आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा.- श्रमिक शेतकरी संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन.
🛑आजरा तालुक्यातील निराधार नागरिकांना “उत्पन्न दाखले” द्या.- आजरा तालुका सरपंच संघटनेची मागणी.
🛑तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा.- श्रमिक शेतकरी संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील श्रमिक शेतकरी संघटनेने ओला दुष्काळ जाहीर करावा याबाबत आजरा तहसीलदार यांना निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना मानसून पूर्व पावसामुळे शेती मशागत पेरणी न करता आल्यामुळे मालाच्या जमिनी पडीक राहिल्या आहेत.
तसेच इतर जमिनी मध्ये पेरणी करणे जमलेले नाही, जेथे पेरणी झाली आहे तेथे भात पिक लावणी पूर्वीच पाण्याखाली गेले आहे. शेतात पाणी व चिखल असल्यामुळे दुबार पेरणी देखील अशक्य होईल अशा दिशेने परिस्थिती चालली आहे.
उसाचे पिकात सतत पावसामुळे लागवड घालणे शक्य नसल्यामुळे पिकाची वाढ होवू शकलेली नाही. त्यामुळे पिकाचे वजन घटणार आहे.
तरी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, पाहणी करावी व नुकसान भरपाई द्यावी. त्याबाबत आवश्यक उपाय योजना करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर.
कॉम्रेड शांताराम पाटील, नारायन मंडागे, नारायण राणे, धोंडिबा कुंभार, लक्ष्मण केसरकर, विष्णू उंडगे, मारुती पाटील, संजय घाटगे, निवृत्ती मसाळे, विठ्ठल बामणे, शांताराम हरेर सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

🛑आजरा तालुक्यातील निराधार लोकांना “उत्पन्न दाखले” द्या.- आजरा तालुका सरपंच संघटनेची मागणी.
आजरा.- प्रतिनिधी

आजरा तालुका सरपंच संघटने
आजरा तालुक्यातील अनेक वेगवेगळे दाखले दिले जात नाहीत. आपले दिले जावे याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
आजरा तालुक्यातील निराधार लोक तसेच विधवा महिलांना गेले सहा ते सात महिने ‘उत्पन्नाचे दाखले’ ग्राम स्तरावरील महसूल अधिकाऱ्यांनी उत्पनाचे दाखले देणे बंद केले असलेमुळे निराधार लोकांची पेन्शन तसेच विधवा महिलांची पेन्शन मिळणेकामी अडचण निर्माण झाली आहे.
कृपया आपल्या स्तरावरून ग्रामस्तरावरील महसूल अधिकाऱ्यांना सदर लोकांना उत्पनाचे दाखले देण्यासाठी आदेश दयावेत व तशा प्रकारची कार्यवाही करून तालूक्यातील निराधार व विधवा महिलांची पेन्शन मिळण्यासाठी मदत करावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर ता. अध्यक्ष बापू निऊगरे, महिला आघाडी अध्यक्षा सुषमा पाटील तसेच विलास पाटील, महादेव देवकर, मधुकर जाधव, समीर देसाई, रणजीत देसाई, संभाजी सरदेसाई, भारती डेळेकर, कल्पना डोंगरे, स्मिता पाटील सरिता पाटील, प्रियंका आजगेकर सह सरपंच व संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह आहेत.