🛑आजरा नगरपंचायत हद्दीतील पथदिवे व अन्य सुविधा बाबत- नगरपंचायतला अन्याय निवारण समितीचे निवेदन.
🛑नवोदय परीक्षेत व्यंकटराव हायस्कूल,आजरा प्रशालेचे दैदिप्यमान यश.
💥आजरा नगरपंचायत हद्दीतील पथदिवे व अन्य सुविधा बाबत- नगरपंचायतला अन्याय निवारण समितीचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायत हद्दीतील पथदिवे व अन्य सुविधा याबाबत नगरपंचायतला अन्याय निवारण समितीचे निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आजरा नगरपंचायत हद्दीतील नागरीकांच्या सुरक्षिततेच्या व दैनंदिन हालचालीच्या दृष्टीने रस्त्यावरील प्रकाश व्यवस्था सुरळीत रहाणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु सद्या नगरपंचायत हद्दीतील अनेक पथदिवे बंद अवस्थेत आहेत. या सदंर्भात निरीक्षण करुन खालीलप्रमाणे मागण्या केल्या आहेत. यामध्ये
अ) नवीन पोल बसविणेची आवश्यकता असलेली ठिकाणे १) पाण्याच्या टाकी जवळ सद्या असलेले दोन पोलची जागा बदलुन त्याच ठिकाणी रस्त्यावर प्रकाश पडेल अशा योग्य जागेवर बसविणेत यावेत.
२) गांधीनगर नेवरेकर वसाहतमध्ये श्री भगवान पवार गुरुजी यांच्या घरा समोरील रस्त्यावर नवीन एक पोल बसवून त्यावर पथ दिव्याची सोय करणेत यावी.
३) वाडा गल्लीतील बोळामध्ये एक पोल बसविणेची आवश्यकता आहे. याठिकाणी भुमीगत वायरींगची आवश्यकता आहे.
ब) पथदिवे बसविणे व कार्यान्वीत करणे :
७) दत्त कॉलनी, गोठण गल्ली व समर्थ कॉलनी येथील बंद पडलेले पथदिवे दुरुस्त करुन पुन्हा कार्यान्वीत करणे.
२) परोली रस्ता, पारपोलकर वसाहत व खडकापासून ते हॉस्पीटलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कृष्णा कोरवी यांच्या घरापर्यंत पथदिवे दुरुस्ती करुन कार्यान्वीत करणे.
३) सत्संग व नागझरी परीसर वायरींगची दरुस्ती करुन पथदिवे कार्यान्वीत करणे.
४) शिवाजीनगर ते घाटरस्ता व समाधी स्थळ जवळील पथदिव्यांची दुरुस्ती करुन कार्यान्वीत करणे.
५) मेनरोड ते दर्गा गल्ली दरम्यानचा रांगणेकर बोळ यामध्ये पथदिव्याची व्यवस्था करणे.
६) कुंभार गल्ली येथील बंद पडलेले पथदिवे कार्यान्वीत करणे.
आझाद कॉलनी, सिध्दीविनायक कॉलनी, साई कॉलनी, साळगाव रोड कमलकुंज पर्यंत व दर्गा गल्ली मधील पथदिवे दुरुस्त करणेबाबत.
८) शहरात बसविलेले हायमास्क लाईट अनेक ठिकाणी बंद पडलेले आहेत किंवा आपल्याकडून बंद करणेत आले आहेत असे आढळले तेंव्हा रात्रीच्या वेळी सर्व हायमास्क लाईट चालु ठेवावेत.
९) आपल्याकडे विज कर्मचारी कमी असलेचे आढळते तेंव्हा आवश्यक ते कर्मचारी यांची नेमणुक करून विज पुरवठा नियमित होणे विषयी कार्यवाही करावी.
क) रस्त्यावरील खड्डे बुजविणेबाबत..
१) आजरा शहरात नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे सर्व आजरा शहारात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बऱ्याच ठिकाणी चिखल झाला असलेने रस्त्यावरून नागरीकांना चालणे अथवा वाहन चालविणे जीकिरीचे झाले आहे. उदा. साई कॉलनी, राईसमिल परिसर, जोशी गल्ली, गांधीनगर येथील ओढ्याचे ठिकाण व इतरत्र अशी बरीच ठिकाणे आहेत. सदर ठिकाणी मुरुम टाकुन नागरीकांच्या समस्येचे निवारण करणेत यावे.
२) व्यंकटराव हायस्कूल पासून मिनर्वा हॉटेल पर्यंत जे पाणी पूर्ण रस्त्यावरुन वाहत आहे ते पाणी योग्य ती पहाणी करून गटर्समध्ये ड्रेनहोल पाडून त्यामध्ये पाईप बसवून पाणी गटारीमध्ये सोडणेत यावे, जेणे करुन पाणी रस्त्यावरून वाहणार नाही.
आमच्या आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीमध्ये नगरपंचायतीचे कांही अधिकारी व कर्मचारी समाविष्ठ असलेने यातील काही कामाबाबत चर्चा होऊन निवेदन देणेपूर्वीच काही कामे सुरु करून पूर्ण करणेत आलेली असून शकतात. तरी देखील सदर कामे व नियमित स्वरुपात कार्यान्वीत रहातील याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी.
वरील कामांची पुर्तता करून जनतेची मागणी लवकरात लवकर पुर्ण करावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. समीतीचे अध्यक्ष परशुराम बामणे
सुधीर कुंभार अध्यक्ष, सल्लागार समिती, वाय, बी. चव्हाण, सेक्रेटरी, सल्लागार समिती, दिनकर जाधव सचिव, सल्लागार समिती, श्रीरंग सावरतकर
सचिव, जावेद पठाण अध्यक्ष, अल्पसंख्यांक सेल, मदन तानवडे सह सदस्य यांच्या सह्या आहेत.

🛑नवोदय परीक्षेत व्यंकटराव हायस्कूल,आजरा प्रशालेचे दैदिप्यमान यश.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल येथे इयत्ता नववी च्या वर्गात शिकणारी कु सौश्रुति अमित पुंडपळ हिची नवोदय विद्यालय कागल येथे निवड झाली आहे. तिला 85 पैकी 74 गुण मिळाले आहेत. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील मुलांमधून तिची निवड करण्यात आली आहे.

या यशस्वी विद्यार्थीनीला,सौ. ए.डी.पाटील, पी एस.गुरव व्ही.ए.चौगुले,श्री. पाटील आर् एन यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य एम.एम.नागुर्डेकर, माजी प्राचार्य आर.जी. कुंभार, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.तसेच आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव व संचालक आजरा . यांची प्रेरणा लाभली. या यशस्वी विद्यार्थिनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.