तब्बल १४ लाख रुपये लंपास करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश.- तिघेही आरोपी इचलकरंजीचे
आजरा.- प्रतिनिधी

उत्तुर ता. आजरा येथे २३ जून रोजी रात्री १० वाजण्याचा सुमारास थांबलेल्या मालवाहू टेम्पोच्या केबिन मधील तब्बल १४ लाख रुपये लंपास करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले असून तिघेही इचलकरंजी येथील आहेत.
गोवा येथुन इचलकरंजी येथे जाणेसाठी (MH10-AW-8982) या क्रमांकाचा टेंपो नेहमी येत असुन त्या टेंपोच्या पुढील केबीन मध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असते व तो टेंपो उत्तुर येथे आल्यानंतर शिवाजी चौकामध्ये चालक जेवण करण्यासाठी थांबत असतो अशी माहिती शुभम रमेश भोसले, अभिषेक नंदकुमार पोवार, ऋषिकेश सुभाष चौगुले यांना मिळाल्यानंतर त्या टेंपोतील रक्कम चोरी करुन वाटुन घ्यायची असा त्यांनी प्लॅन तयार केला.
ठरलेल्या प्लॅन नुसार दिनांक २३ रोजी रात्री १० वा चे सुमारास अभिषेक पोवार व ऋषिकेश चौगुले हे अभिषेक पोवार याचेकडील दुचाकी वरुन उत्तुर येथील शिवाजी चौक येथे गेले व चौकामध्ये चालक जेवण करण्यासाठी थांबलेल्या MH10-AW-8982 या क्रमांकाच्या टॅपोच्या केबीन मधुन रोख रक्कम चोरी केली व निघुन इचलकरंजी येथे परतले. तसेच चोरलेली रक्कम शुभम याने ऋषिकेश चौगुले याचे घरी ठेवली. त्या दोघांना पोलिसांनी ताब घेतले त्यानंतर तिसरा आरोपी ऋषिकेश चौगुले यास त्याचे घरातुन त्यानतर तिसरा आरोपी ऋाषकेश चौगुले यास त्याच नारळ चौकातील घरातुन पोलीसांनी ताब्यात घेतले.

सदर आरोपीकडून रोख रक्कम १३,१५,०००/- रुपये व गुन्हयात वापरलेली अॅक्सेस मोटर सायकल (MH09-FW-5090 ) व मोबाईल हँडसेट असा एकूण १४,६५,०००/- रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करणेत आला आहे.

गुन्हयाचा पुढील तपास आजरा पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार समीर कांबळे (भाद आजरा), प्रविण पाटील, दिपक घोरपडे, विशाल चौगुले यांनी केली.