Home कोंकण - ठाणे दोन तासांच्या राड्यानंतर मनसेचा मोर्चा निघालाच;मराठी आवाजापुढे फडणवीस सरकार नरमले!

दोन तासांच्या राड्यानंतर मनसेचा मोर्चा निघालाच;मराठी आवाजापुढे फडणवीस सरकार नरमले!

दोन तासांच्या राड्यानंतर मनसेचा मोर्चा निघालाच;मराठी आवाजापुढे फडणवीस सरकार नरमले!

मुंबई.- प्रतिनिधी.

अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेने आज सकाळी मोर्चा काढण्याचे ठरवले होते. या मोर्चाला पोलिसांनी सुरुवातीला या मोर्चाला परवानगी नाकारली होती.

मोर्चाआधीच मोर्चेकऱ्यांची धरपकड केली. त्यामुळे राजकारणाचा पारा चढला होता. मनसे आणि ठाकरे गट मोर्चावर ठाम होते. विरोधकांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मोर्चाला परवानगी नाकारल्याने वातावरण अधिक चिघळत चालल्याचे लक्षात येताच दोन तासांनंतर या मोर्चाला परवानगी देण्यात आली. मराठी जनांच्या आवाजापुढे फडणवीस सरकार नरमले आणि परवानगी दिली अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांच्या या वागणुकीविरोधात सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक यांनी (Pratap Sarnaik) तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता ते या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाल्याची माहिती मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदर परिसरात परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला उत्तर म्हणून आज मनसे आणि ठाकरे गटाने प्रतिमोर्चा काढण्याचे निश्चित केले होते. या मोर्चाची सर्व तयारी करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी या मोर्चाला ऐनवेळी परवानगी नाकारली. मोर्चेकऱ्यांना नोटीसा धाडण्यात आल्या. तसेच त्यांची धरपकड सुरू करण्यात आली. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना तर पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेण्यात आले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.