Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र पेरणोली श्री कुरकुंद्रे देव ओढ्याच्या मोहरीत म्हैस अडकून मृत्यू.( पाण्याच्या प्रवाहातून मोहरीत...

पेरणोली श्री कुरकुंद्रे देव ओढ्याच्या मोहरीत म्हैस अडकून मृत्यू.( पाण्याच्या प्रवाहातून मोहरीत अडकली होती म्हैस.)

Oplus_131072

पेरणोली श्री कुरकुंद्रे देव ओढ्याच्या मोहरीत म्हैस अडकून मृत्यू.
( पाण्याच्या प्रवाहातून मोहरीत अडकली होती म्हैस.)

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा पेरणोली येथील शेतकरी भगवान ज्ञानोबा येरूडकर हे सायंकाळी जनावरे धुण्यासाठी घेऊन गेले असता. ओढ्यामध्ये म्हैस वाहून जाईल इतकं पाणी नसल्यामुळे पाण्यामध्ये म्हैस धूत असताना
अचानक पावसाच्या दोन मोठ्या सळका आल्या या जोराच्या पावसात ओढ्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक झालं व या प्रवाहातून म्हैस वाहू लागली आरडा ओरडा करून परिसरातील शेतात काम करणाऱ्या ग्रामस्थांना बोलण्यापर्यंत म्हैस ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहातून मोहरीच्या नळ्यामध्ये म्हैस अडकली व नळ्यामध्ये अडकली पाण्याचा दाबाने गुदमरून या ठिकाणी म्हैस मयत झाली.


याबाबत ग्रामस्थ व तरुण वर्गाच्या मदतीने मयत म्हशीला बाहेर काढले.. ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय विभागाला तात्काळ कळवले याबाबत पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी येऊन पंचनामा करणार असल्याची समजते.

चौकट.

शासनाकडून अशी पाळीव जनावरे यांचा विमा नसेल तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जात नाही. परंतु अनेक शेतकऱ्यांचा आपल्या उदरनिर्वाहासाठी एक दोन जनावरे घेऊन दुग्ध व्यवसायावर आपला घरचा खर्च चालवत असतात. यामध्ये एका दुसऱ्या जनावराचा शेतकऱ्यांच्याकडून विमा उतरला जात नाही. अशा अपघाती घटना घडल्यानंतर शेतकऱ्यांचे नुकसान होतं. यामुळे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पेरणोली ग्रामस्थांकडून होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.