आजरा – संताजी पुलावर उबाठा सेनेची जोरदार निदर्शने.- संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाच माहित नाही.- रस्ता कोणाकडे आहे.
आजरा.- प्रतिनिधी.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजरा – बुरुडे- महागांव रोडवर अनेक खड्ड्यांचे साम्राज्य व संताजी पुलाला १०० वर्ष पूर्ण झाल्याने सदर पुल व जीर्ण झाले असून
यासाठी पर्यायी पुल करावे. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संताजी पुलावर निदर्शने करण्यात आली.

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख श्री शिंत्रे म्हणाले या विभागाचे उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम तसेच रस्त्याचे काम करणाऱ्या बांधकाम कंपनी यांना वारंवार भेटून निवेदन देऊन बैठका करून रस्त्याच्या कामाची व पर्यायी पुलाची शिवसेनेच्या वतीने मागणी करत आहोत. पण हे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. या अधिकाऱ्यांना रस्ता कोणाकडे आहे हेच माहित नाही. तहसीलदार, यांच्या दालनात झालेल्या बैठकीत लवकरच याबाबतची माहिती देतो असे सांगतात व पुन्हा दुर्लक्ष करतात, रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. हा नेमका प्रकार काय आहे. या रस्त्याचे व पर्यायी पुला बाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. अन्यथा यापेक्षाही मोठा आंदोलन तिरडी मोर्चा आपल्या विभागाच्या दारात काढण्यात येईल असे श्री जिल्हाप्रमुख शिंत्रे बोलताना म्हणाले.

यावेळी ता. प्रमुख युवराज पोवार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले. आजरा – महागाव रोडवरील बुरुडे येथे खड्ड्यामधून रस्ता शोधावा लागतो. याबाबत आम्ही शिवसेनेच्या वतीने स्वतः अनेक वेळा संपर्क संपर्क साधला व या विभागाचे उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम तसेच रस्त्याचे काम करणाऱ्या बांधकाम कंपनी यांना वारंवार भेटून या रस्त्याच्या दुरुस्तीची व सदर रस्त्यावरील संताजी पुलाची दुरुस्तीची, किंवा पर्यायी पुलाची मागणी केली परंतू सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

या मार्गावरील बुरुडे येथील संताजी पुल याची मर्यादा संपली असून सदर पुल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तसेच ठेकेदार कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांना उपस्थित राहून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत लेखी आश्वासन मिळावे. अशी मागणी केली असताना देखील हे अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत तसेच सद्या मंजूर केलेल्या इस्टेमेंट मध्ये सीड फार्म ते वाटंगी फाटा संताजी पुलासहीत या रस्त्याच्या दुरुस्ती काम मंजूर लवकरात लवकर चालू करावे अशी आम्ही वेळोवेळी मागणी करत आहोत.
तर चंदगडचे आमदार म्हणतात शक्तिपीठ चंदगड तालुक्यातील गेला पाहिजेत. आपल्या मतदारसंघातील खड्ड्याचे साम्राज्य असलेला रस्ता दुरुस्त होत नाही. व जीर्ण झालेल्या या पुलाची मागणी करत नाहीत. किंवा याकडे लक्ष देत नाहीत. नको असलेल्या शक्तिपीठाचा अट्टाहस कशासाठी करतात.
अधिकारी आजरा मध्ये येतात या ठिकाणी येत नाहीत. यांच्या डोक्यावर कोणाचा हात आहे. येणाऱ्या पंधरा दिवसात सदर खड्डे पडलेल्या रस्त्याची डागडुजी व संताजी पर्यायी फुलाची मंजुरी नाही मिळाल्यास यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल असे ता. प्रमुख श्री पोवार म्हणाले.

या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, जिल्हाप्रमुख युवा सेना महेश पाटील, सौ. वैशांली गुरव सरपंच बुरुडे, सौ. गीता देसाई, महिला आघाडी प्रमुख, उपतालुका प्रमुख संजय येसादे, सुनील डोंगरे, शिवाजी आढाव, विभाग प्रमुख दिनेश कांबळे, दयानंद भोपळे, चंदर पाटील, सुनिल बागवे उपसरपंच, बुरुडे, सौ. प्रमिला पाटील, उपसरपंच, हात्तिवडे, सरपंच, मेंढोली, उपशहर प्रमुख समीर चाँद, प्रमुख, उपतालुका प्रमुख, युवासेना सुयश पाटील
सौ. गीता देसाई, महिला आघाडी प्रमुख, संजय कांबळे, ग्रा.पं. सदस्य, बुरुडे, बबन कातकर शिवाजी इंगळे, शिवाजी कुंभार, महिला पदाधिकारी, शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट.
संताजी पुलावर एक तास निदर्शने..
आजरा शहरात आठवडा बाजार यामुळे तालुक्यातील नागरिकांना त्रास होऊ नये. म्हणून रस्ता रोको न करता निदर्शने करत घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले परंतु त्यांच्याकडे हा रस्ता कोणाकडे आहे.
याबाबतचा कागदपत्रे कोणताही पुरावा आढळून येत नव्हता वेळोवेळी यांना हा रस्ता कोणाकडे आहे. याची माहिती द्यावी. असे तहसीलदार यांच्या दरम्यानच्या बैठकीत मधील सांगण्यात आले होते. तरी आज तागायत देखील सदर अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली नाही. यामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी वरिष्ठ अधिकारी आजऱ्यात आले होते. परंतु आंदोलनाकडे येण्यास नकार दिला. यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक संतप्त झाले. नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई उपस्थित होते. या आंदोलनात सपोनि नागेश यमगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त होता.