आजऱ्यातील लक्ष्मीबाई .- महाराष्ट्र अंधश्रध्द निर्मूलन जि. प्रतिनिधी गिता पोतदार व सहकाऱ्यांच्या मदतीने झाली जडातून मुक्त.
आजरा.- प्रतिनिधी
आजरा शहरालगत असणाऱ्या गांधीनगरातील, अंत्यत गरीब परीस्थिती जगणार्या, आणि वयाची सतरी पार केलेल्या लक्ष्मीबाई अर्जुन नाईक यांना मानेवरच्या जटेने असह्य केले होते. गेली दोन महीने पावसाच्या भितीने डोक्यावरून अंघोळ हि केली नव्हती.
एकदा जट भिजली तर या पावसात वाळणार नाही, अनं वाळली नाहीतर, वास सुटनार ही भिती मनात होती. अंगात ताकत होती, तोपर्यंत त्यानी डोक्यातील जटेचा भार बारा वर्षे सांभाळ केला.
सामाजिक कार्यकर्त्या गिताताई पोतदार यानी, त्याना अनेक वेळा जट काढण्यासाठी विचारलं होतं, पण देवीच्या दास्तीने होकार दिला नाही. आता नवरा वयस्कर असून इंचलकरंजीला मुली कडे राहतो. मुलगा निट वागत नाही. त्यांच्या वयोमानाने मानेच्या व्याधी वाढल्या आहेत, काम होत नाही, सरकारी पेन्शन मिळते, ती घेण्यासाठी बँकेत गेल्यावर कंँशिअर बाई भैरवीताई नी जटेचे ओझे कमी करण्याचा हट धरला होता. दरवर्षी यल्लमादेवीच्या दर्शनाला जातात, देवीवर श्रध्दा आहे. पण आता वयाचा विचार करून, मानदुखीच्या त्रासतून मुक्त होण्यासाठी त्यांनी गिताताईना जटेतुन मुक्त करा असे सांगितलं.
आणि लक्ष्मीबाई च्या होकाराने महाराष्ट्र अंधश्रध्द निर्मूलन जिल्हा प्रतिनिधी गिता पोतदार यानी आजरा तालुका कार्याध्यक्ष काशिनाथ मोरे, तालुका प्रधान सचिव संजय घाटगे, तालुका उपाध्यक्ष भिकाजी कांबळे, हाळोली शाळेच्या शिक्षिका सुरेखा नाईक याच्या मदतीने लक्ष्मीबाई च्या डोक्यावरली आठ किलो वजनाची जट कमी करून जडातून मुक्त केले अनं लक्ष्मी मावशी च्या चेहऱ्यावर हशू फुलले.अंनिस संघटने मार्फत यथोची सत्कार केला.
यावेळी काशिनाथ मोरे यानी शारीरिक स्वच्छता सातत्याने केल्यास शरीर व मन तंदुरुस्त राहते. तालुक्यातील अजून अनेक गावातील महिलांच्या डोक्यात जटा आहेत. काही महिला जटा निर्मूनलाला तयार होत नाहीत. व वाढत्या वयाने त्याना त्रास होतो, तो कमी होण्यासाठी अंनिस कार्यकर्ते शी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले.