Homeकोंकण - ठाणेबत्तीस शिराळ्यात नागपंचमीची परंपरा पुन्हा सुरू होणार? सरकार दरबारी हालचाली.- जिवंत नागाची...

बत्तीस शिराळ्यात नागपंचमीची परंपरा पुन्हा सुरू होणार? सरकार दरबारी हालचाली.- जिवंत नागाची पूजा करण्याचा काय आहे इतिहास?🟥‘आय लव्ह यू’ म्हणण्यात लैंगिक हेतू नाही!मुंबई हायकोर्टाचा निकाल.- विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष सुटका🟥वीज कोसळण्याची पूर्वसूचना देणारे अ‍ॅप विकसित करणार🟥अवैध वाळू उत्खनन केल्यास तलाठ्यासह मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार💥झाड तोडल्यास ५० हजार रुपयांच्या दंडाबाबत सरकारची माघार🟥राज्य सरकारकडून कॅन्सर रुग्णांची थट्टा.- जिल्हा रुग्णालयात लोकार्पणानंतर किमोथेरपी सेंटरला कुलूप🌧️☔कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

🟥बत्तीस शिराळ्यात नागपंचमीची परंपरा पुन्हा सुरू होणार? सरकार दरबारी हालचाली.- जिवंत नागाची पूजा करण्याचा काय आहे इतिहास?
🟥‘आय लव्ह यू’ म्हणण्यात लैंगिक हेतू नाही!मुंबई हायकोर्टाचा निकाल.- विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष सुटका
🟥वीज कोसळण्याची पूर्वसूचना देणारे अ‍ॅप विकसित करणार
🟥अवैध वाळू उत्खनन केल्यास तलाठ्यासह मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार
💥झाड तोडल्यास ५० हजार रुपयांच्या दंडाबाबत सरकारची माघार
🟥राज्य सरकारकडून कॅन्सर रुग्णांची थट्टा.- जिल्हा रुग्णालयात लोकार्पणानंतर किमोथेरपी सेंटरला कुलूप
🌧️☔कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

🟥बत्तीस शिराळ्यात नागपंचमीची परंपरा पुन्हा सुरू होणार? सरकार दरबारी हालचाली.- जिवंत नागाची पूजा करण्याचा काय आहे इतिहास?

सांगली :- प्रतिनिधी

नागपंचमीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या बत्तीस शिराळ्यात आता पुन्हा एकदा जिवंत नागाच्या पूजेची प्रथा सुरू होण्याची शक्यता आहे. ही प्रथा परत सुरू करण्यात यावी यासाठी भाजप आमदार सत्यजित देशमुख यांनी लक्षवेधी मांडली. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनीही जिवंत नागाची प्रथा परत सुरू करावी अशी मागणी केली. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी यावर दिल्लीत बैठक होणार असून त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी आशा व्यक्त केली.

सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्याला जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा ही शेकडो वर्षांपासून आले.नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा केली जायची आणि त्यांची मिरवणूक काढली जायची. पण प्राणी हक्क संघटनांच्या आक्षेपानंतर 2002 साली सर्वोच्च न्यायालयाने जिवंत नागाची पूजा बंद करण्याचे आदेश दिले आणि या प्रथेला खंड पडला.दरम्यान, बत्तीस शिराळामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा पुन्हा सुरू केली जाईल असं आश्वासन अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलं होतं.

🛑बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीचा इतिहास काय?

बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीला शेकडो वर्षांची परंपरा असल्याचं सांगितलं जातंय. दहाव्या शतकात गोरक्षनाथ महाराज शिराळ्यात आले होते. त्यावेळी पंचमीच्या दिवशी ते एका घरी भिक्षा मागायला गेले. ते घर महाजन नावाच्या व्यक्तीचं होतं. भिक्षा जरी मागितली असली तरी बराच वेळ झाला त्यांना भिक्षा मिळाली नाही. नंतर त्या घरातून गृहिणी बाहेर आली आणि तिने महाराजांना भिक्षा दिली.भिक्षा द्यायला वेळ का झाला असं गोरक्षनाथांनी त्या गृहिणीला विचारलं. त्यावर आपण देव्हाऱ्यातील मातीच्या नागाची पूजा करत असल्याचं त्या गृहिणीने सांगितलं. तू जिवंत नागाची पूजा करशील का असं गोरक्षनाथांनी तिला विचारलं. त्यावर त्या गृहिणीने त्यांना होय असं उत्तर दिलं. तेव्हापासून पंचमीच्या दिवशी बत्तीस शिराळ्यात नागाची पूजा केली जाते.

बत्तीस शिराळ्यातील महिला या नागाला आपला भाऊ मानतात आणि त्याच्यासाठी उपवास करतात. त्या दिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये यासाठी स्वयंपाकगृहात काही चिरले जात नाही किंवा तळले जात नाही. नागपंचमीच्या निमित्ताने नागाची पूजा करुन त्याला दूध पाजले जाते आणि त्याला वेगवेगळ्या भाज्यांचा निवैद्यही दाखवला जातो.

न्यायालयाने बंदी घालायच्या आधी बत्तीस शिराळ्यात मोठ्या उत्सहाने नागपंचमी साजरी केली जायची. आधी गावातील अंबामाता मंदिरात नागाची पूजा केली जाते आणि नंतर प्रत्येकाच्या घरात पूजा केली जायची. या दिवशी नागाच्या प्रतिमेची आणि जिवंत नागांची ट्रॅक्टरमधून मिरवणूकही काढली जायची. बत्तीश शिराळ्यातील नागपंचमी पाहण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातून हजारो लोक उपस्थिती लावतात.

👉बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीची दखल ही केवळ देशभरातच नव्हे तर जागतिक स्तरावरही घेतली गेली आहे.

🟥‘आय लव्ह यू’ म्हणण्यात लैंगिक हेतू नाही!मुंबई हायकोर्टाचा निकाल.- विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष सुटका

मुंबई :- प्रतिनिधी.

किशोरवयीन मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या तरुणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुटका केली. ‘आय लव्ह यू’ म्हणणे केवळ भावना मांडणे आहे. त्यात कोणताही लैंगिक हेतू नाही, असा निकाल न्यायालयाने दिला.२०१५ मध्ये एका अल्पवयीन मुलीचा हात धरून आरोपीने ‘आय लव्ह यू’ म्हटले होते. त्याच्याविरोधात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. नागौर येथील विशेष कोर्टाने २०१७ मध्ये त्याला दोषी ठरवले. या निकालाला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्या. उर्मिला जोशी-फाळके यांनी निकालात सांगितले की, पीडितेशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा त्याचा खरा हेतू होता हे दर्शविणारी कोणतीही परिस्थिती या प्रकरणात दिसत नाही. ‘आय लव्ह यू’ हे शब्द स्वतःच विचारात घेतल्याप्रमाणे लैंगिक हेतू ठरणार नाहीत, असे न्यायालयाने म्हटले.

🟥वीज कोसळण्याची पूर्वसूचना देणारे अ‍ॅप विकसित करणार

मुंबई :- प्रतिनिधी

राज्यात वीज कोसळून होणारे मृत्यू टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. सध्या ४० किलोमीटर परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना दामिनी आणि सचेत अ‍ॅपद्वारे दिले जात आहे. कमी परिघात वीज कोसळण्याची पूर्वसूचना देणारे नवीन अ‍ॅप विकसित करण्यात येईल अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. वीज कोसळण्याची संभाव्य पूर्वसूचना देणारी सयंत्रे बसविण्याबाबत भाजपच्या संतोष दानवे यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना महाजन म्हणाले, राज्यात पावसाळी वातावरणात वीज पडून होणा-या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना याचा सर्वाधिक धोका होत आहे. मुसळधार पावसाबरोबरच वीज कोसळते आणि वादळी परिस्थिती उद्भवते. अशावेळी शेतीकाम करत असताना अनेक वेळा शेतकरी वीज पडण्याच्या दुर्घटनेत बळी पडतात. वीज पडण्याची पूर्वसूचना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचून जीवित हानी टाळता यावी,

यासाठी भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेने विकसित केलेली ‘दामिनी’ आणि ‘सचेत’ ही दोन अ‍ॅप्स नागरिकांना वीज पडण्याच्या आधीच ४० किलोमीटर परिघात सावध करणा-या सूचना देतात. राज्य सरकारच्या विविध विभागांतर्फे या अ‍ॅप्सचा प्रचार आणि प्रसार सातत्याने केला जात असल्याचे महाजन यांनी सांगितले. राज्यात सन २०२२ मध्ये वीज पडून २३६ व्यक्तींचा तर २०२३ मध्ये १८१ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. वीज कोसळून होणा-या मृत्यूंच्या प्रकरणात आपत्ती मदतीच्या निकषांनुसार राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. २०१७ नंतर वीज पडून मृत्यू झाल्यास कुटुंबियांना चार लाखांची मदत, गंभीर जखमी व्यक्तीस अडीच लाखांची मदत, तर जनावरांच्या नुकसानीसाठी गाय/म्हैस/बैल यांना ३७ हजार ५००, मेंढी-शेळीसाठी चार रुपये अशी मदत सरकारकडून दिली जाते. ही मदत वाढविण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

🟥अवैध वाळू उत्खनन केल्यास तलाठ्यासह मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार

आर्वी :- प्रतिनिधी

तालुक्यातील देऊरवाडा येथील अवैध वाळू उत्खनन आमदार दादाराव केचे यांनी चव्हाट्यावर आणले होते. हा प्रश्न आता थेट विधान परिषदेत गाजला. यावर उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तलाठ्यांसह मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता या दोन्ही कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे.

🟥देऊरवाडा येथील वाळू घाटातून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती नागरिकांनी आमदार दादाराव केचे यांना दिली होती. त्या माहितीच्या आधारे आमदार केचे यांनी २६ एप्रिल २०२५ रोजी देऊरवाडा येथील घाटावर जाऊन वाळू चोरीचा भंडाफोड केला होता. तेव्हाच त्यांनी जिल्हाधिकारी व महसूलमंत्र्यांना फोन करून माहिती दिली होती. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. मंगेश क्षीरसागर यांच्या शेताजवळ वाळूचा मोठा ढीग आणि सेक्शन पंप, मशीन, स्वयंपाकाचे साहित्य व सोफासेट असे साहित्य आढळून आले होते. याप्रकरणी कारवाई करून वाळू जप्त करण्यात आली होती. ही वाळू घरकुल लाभार्थ्यांना द्यावी, अशी मागणी असतानाही प्रशासनाकडून थातूरमातूर कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रकार केला होता. परिणामी आमदार दादाराव केचे यांनी विधानपरिषेत प्रश्न उपस्थित करून याकडे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधितांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले तसेच अटकही केल्याची माहिती दिली. याशिवाय जे काम महसूल अधिकाऱ्यांचे होते ते काम आमदारांनी केले. वाळूचा काळाबाजार उघडकीस आणला, त्यामुळे संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना निलंबित केले जाईल, असेही स्पष्ट केले आहे.

🟥झाड तोडल्यास ५० हजार रुपयांच्या दंडाबाबत सरकारची माघार

मुंबई :- प्रतिनिधी.

झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता. तसा अध्यादेश ही काढण्यात आला होता. मात्र सरकारने आज याबाबतचे विधेयक मागे घेतले. यावरून माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विद्यमान वनमंत्री गणेश नाईक या भाजपाच्या आजी-माजी मंत्र्यांमध्ये विधानसभेत खडाजंगी झाली. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्यासाठी १ हजाराचा दंड ५० हजर रुपये केला होता. मात्र मुनगंटीवार यांच्या कार्यकाळातील हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करणारे विधेयक मागे घेण्यात आले. सुधीर मुनगंटीवार यांनी याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. विधेयक का मागे घेतले जात आहे हे मला माहीत नाही. जगात ग्लोबल वार्मिगचा प्रश्न आहे, प्रत्येक गावामध्ये झाड तोडण्याची एक प्रकारची स्पर्धा सुरू आहे. सध्याच्या निर्णयानुसार झाड तोडता येत नाही असे नाही, फक्त परवानगी घ्यावी लागते. पण, मंत्री महोदय हे विधेयक मागे घेण्यासाठी का सांगत आहेत? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला. त्यांनी आपल्याच सरकारच्या भूमिकेला तीव्र विरोध केला.

🔴नवीन बदलासह कायदा आणू.- वनमंत्री गणेश नाईक

विधेयकासंदर्भातील चर्चेत बोलताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, या विधेयकात झाडांची फांदी तोडणेही झाड तोडल्यासारखे आहे. झाडे तोडले तर ५० हजार रुपयांचा दंड आहे. शेतक-यांने अजाणतेपणे झाड तोडले तरी ५० हजार रुपयांचा दंड होता. कुणाला तरी फायदेशीर ठरण्यासाठी हे विधेयक मागे घेतले जात नाही. सुधीरभाऊंच्या हेतूविषयी शंका नाही. पण, तात्पुरता हा कायदा मागे घेतोय. नवीन बदलासह कायदा आणू असे आश्वासन वनमंत्री नाईक यांनी यावेळी दिले.

🟥राज्य सरकारकडून कॅन्सर रुग्णांची थट्टा.- जिल्हा रुग्णालयात लोकार्पणानंतर किमोथेरपी सेंटरला कुलूप

🟣छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात फेब्रुवारी महिन्यात मोठा गाजावाजा करून किमोथेरपी सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. परंतु, याठिकाणी किमोथेरपी देण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी-कर्मचारीच मिळाले नाहीत. याशिवाय किमोथेरपीची औषधीही मिळाली नाही. परिणामी, लोकार्पणानंतरही हे सेंटर कुलूपबंदच आहे.

🟥राज्यभरातील विविध ठिकाणी कर्करोग मोबाइल व्हॅन, १०२ रुग्णवाहिका, सीटी स्कॅन, ‘डे केअर किमोथेरपी सेंटर’ इ. सुविधांचे ९ फेब्रुवारी रोजी ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एकाचवेळी ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. यात छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा रुग्णालयातील ‘डे केअर किमोथेरपी सेंटर’चा समावेश होता. शासकीय कर्करोग रुग्णालय राज्यभरातील कॅन्सर रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. या रुग्णालयावरील किमोथेरपीचा भार काही प्रमाणात कमी करण्याच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालयातील किमोथेरपी सेंटर महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु, केवळ लोकार्पणापुरतेच हे सेंटर राहिले. लोकार्पणाला ४ महिने उलटूनही औषधी, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांअभावी याठिकाणी किमोथेरपीला सुरुवात झालेली नाही.

🛑दहा खाटा धूळ खात

जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा खाटांचे ‘डे केअर किमोथेरपी सेंटर’ साकारण्यात आले आहे. याठिकाणी दररोज दहा कॅन्सर रुग्णांना मोफत किमोथेरपी घेता येईल,असे सांगण्यात आले होते.

👉किमोथेरपी म्हणजे काय?

किमोथेरपी हा एक वैद्यकीय उपचार आहे, जो कर्करोग बरा करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या औषधांचा वापर करून केला जातो. ही औषधे शरीरातील वेगाने वाढणाऱ्या कर्करोग पेशींवर प्रभाव टाकून त्यांना नष्ट करतात. कर्करोग पूर्णपणे नष्ट करणे, कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवणे किंवा मंदावणे, इतर अवयवांमध्ये कर्करोग पसरू न देणे, वेदना कमी करणे किंवा लक्षणे नियंत्रित ठेवणे ही किमोथेरपीमागील उद्दिष्ट असतात.

👉लवकरच सेंटर सुरू होईल

वैद्यकीय अधिकाऱ्यांची जागा रिक्त आहे. चार पैकी दोन परिचारिकांची पदे भरलेली आहेत. परिचारिकांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल. औषधींचीही मागणी केलेली असून, लवकरच किमोथेरपी सेंटर सुरू होईल.

डाॅ. जितेंद्र डोंगरे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक

🌧️☔कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई :- प्रतिनिधी

राज्यात पाऊस सक्रीय होणार आहे. पुणे शहरात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. मुंबईतील अनेक भागांत बुधवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे. या पावसाचा जोर गुरुवारी असणार आहे. पुणे आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, नाशिक या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भात अजूनही पाऊस सक्रीय झाला नाही. परंतु ६ जुलैपासून या भागांत पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलैपासून महाराष्ट्रातील कोकण व घाट भागात पाऊस चांगला सक्रीय होणार आहे.

तसेच विदर्भ व मराठवाडा काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता. यामुळे या भागात पावसाची आकडेवारी सुधाणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत ३ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात गुरुवारी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये वातावरणात गारवा निर्माण होणार असला, तरी सध्या पावसाचा जोर कमी असल्याने कुठल्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मात्र, काही निवडक भागांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही पावसाचे प्रमाण मध्यम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.