🛑कन्या विद्या मंदिर, उंचगावच्या विद्यार्थिनींनी अनुभवली इलेक्ट्रॉनिक वोटिंग पद्धतीने शालेय निवडणूक !
🛑आजरा तालूक्यात “ओला दुष्काळ” जाहीर करा. – सरपंच संघटनेची मागणी..
💥कन्या विद्या मंदिर, उंचगावच्या विद्यार्थिनींनी अनुभवली इलेक्ट्रॉनिक वोटिंग पद्धतीने शालेय निवडणूक !
उंचगाव .- प्रतिनिधी.

कन्या विद्या मंदिर, उंचगाव येथे दिनांक २/७/२०२५ रोजी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक २०२५-२६ उत्साही वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. विशेष बाब म्हणजे यंदा प्रथमच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (EVM प्रमाणे) मतदान घेण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. इयत्ता ३ री ते ७ वीच्या एकूण १५१ विद्यार्थिनींनी आपला मताधिकार बजावला. उमेदवारी अर्ज देणे, मागे घेणे, चिन्ह वाटप, प्रचार, आचारसंहिता, मतदान आणि निकाल या सर्व टप्प्यांमधून निवडणूक पार पडली.
प्रौढ मतदान पद्धती प्रमाणे विद्यार्थिनी मतदान स्लिप घेऊन आत प्रवेश करत होत्या. बाहेरील शिस्त राखण्यासाठी बाल पोलिस उभी केली होती. आत स्लिप जमा करणे, यादीत नाव पाहून सही करणे, बोटाला शाई लावून घेऊन मग इलेक्ट्रॉनिक वोटिंग पद्धतीने टॅब वर आपल्या ऐच्छिक उमेदवारा समोरील बटण दाबून मत देणे अशा सर्व लोकशाहीच्या प्रक्रियेतून प्रत्येक विद्यार्थी गेला.
शालेय निवडणूक ही विद्यार्थ्यांसाठी लोकशाही मूल्यांची प्रत्यक्ष शिकवण देणारी एक महत्वपूर्ण प्रक्रिया आहे. यामधून नेतृत्व, मताधिकार, जबाबदारी, आणि निर्णयक्षमतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहान वयातच समजते. लोकशाही म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मत मांडण्याचा हक्क. शाळेमधील निवडणूक हीच ती पहिली पायरी जिथे विद्यार्थी “लोकशाही म्हणजे काय?” हे अनुभवातून शिकतात. मतदान, प्रचार, उमेदवारी, निकाल हे सर्व टप्पे शिक्षणाचाच एक भाग ठरतात. या अभिनव उपक्रमात मुख्याध्यापक श्री. नारायण बेळनेकर, अध्यापक डॉ. निशा काजवे, सौ शुभदा सुतार, सौ. रेखा मांडरेकर सौ. संध्या कासार, सौ. आशाराणी भोसले आणि श्री. रविंद्र बडे शाळेतील शिक्षक अधिकाऱ्यांनी नियोजनपूर्वक जबाबदाऱ्या पार पाडल्या. विद्यार्थिनींनी लोकशाही मूल्यांची अनुभूती घेतली. मतदार, उमेदवार व शिक्षकवृंद यांनी मिळून या प्रक्रियेला एक लोकशाही सणाचे स्वरूप दिले
या उपक्रमाचे उद्घाटन श्री. नारायण मन्नाडे (छत्रपती विकास सेवा सोसायटी, उचगावचेअरमन) यांच्या हस्ते करण्यात आले. सोसायटीचे माजी चेअरमन श्री. बाळासाहेब संकपाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. कृष्णात रेवडे उपाध्यक्ष श्री. गणेश नागटिळक, कुमार विद्या मंदिर उंचगावचे मुख्याध्यापक श्री. संजय लोंढे, तसेच शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते.
‘लोकशाही शाळेत रुजते, जेव्हा विद्यार्थ्यांना मत देण्याची संधी मिळते.”
🛑आजरा तालूक्यात “ओला दुष्काळ” जाहीर करा. – सरपंच संघटनेची मागणी..
आजरा.- प्रतिनिधी

आजरा तालुक्यामध्ये अति पावसामुळे पेरणी झालेली नाही. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा. असे सरपंच संघटनेने आजरा तहसीलदार समीर माने यांना निवेदन दिलेली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मागील मे महिन्यापासूनच पावसाचे प्रमाण अधिकच आहे. तसेच जून महिन्यात तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. धरणे भरून ओव्हरफ्लो झाली आहेत.
शेतात पाणी तुंबल्यामुळे पेरणी करण्यामध्ये अडचणी होत आहेत त्यामूळे शेतकऱ्यांच्या पेरण्या राहील्या आहेत. शेतकऱ्यांची भात, नाचना, भुईमुग सोयाबीन व इतर सर्व बियाने पेरली असून त्यांचे सर्व पीक अति वृष्टीमुळे कुजून, खराब होवून गेलेले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे. दुबार पेरणी करूनही पेरलेले बियाने कुजून जात आहे. ऊस पिकामध्ये अति पावसाने पाणी साचले आहे.
त्यामुळे ऊसाचीही वाढ खुंटली आहे. भात पीक ९३०० हेक्टर, नाचणी ३२०० हेक्टर, ऊस ६६०० हेक्टर, भुईमुग १५६० हेक्टर वरील पिकांचे अंदाजे नुकसान झाले आहे.
वरील सर्व गोष्टींचा विचार करून सर्व पिकांचे पंचनामे करून आजरा तालूक्यात ‘ओला दुष्ळाळ’ जाहीर करून शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचे एकरी ५० हजारांची आर्थिक मदत तातडीने मिळविण्यासाठी आपल्यामार्फत शासनाकडे शिफारस करावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर सरपंच संघटनेचे ता. अध्यक्ष बापू निऊगरे, महिला आघाडी अध्यक्षा सुषमा पाटील, सरपंच सौ. स्मिता पाटील, भारती डेळेकर, कल्पना डोंगरे, तसेच संघटनेचे संभाजी सरदेसाई, मारुती मोरे व माजी सरपंच सह पदाधिकारी उपस्थित होते.