आजरा – संताजी पुलावर उबाठा सेनेचा दि ४ रोजी रस्ता रोको – आजरा तहसीलदार यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजरा – बुरुडे- महागांव रोडवर अनेक खड्ड्यांचे साम्राज्य याबाबत जरा तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
महागाव रोडवरील बुरुडे येथे खड्ड्यामधून रस्ता शोधावा लागतो. याबाबत आम्ही शिवसेनेच्या वतीने स्वतः अनेक वेळा संपर्क संपर्क साधला व या विभागाचे उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम तसेच रस्त्याचे काम करणाऱ्या बांधकाम कंपनी यांना वारंवार भेटून या रस्त्याच्या दुरुस्तीची व सदर रस्त्यावरील संताजी पुलाची दुरुस्तीची मागणी केली परंतू सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे आपल्या सर्वांचेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
तसेच या मार्गावरील बुरुडे येथील संताजी पुल याची मर्यादा संपली असून सदर पुल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. याचा निषेध म्हणून आम्ही शुक्रवार दि. ०४/०७/२०२५ रोजी ठिक ११.०० वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे व उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील यांचे नेतृत्वाखाली संबंधीत रस्त्यावर व संताजी पुलावर रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. तरी आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तसेच ठेकेदार कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांना उपस्थित ठेवून तात्काळ रस्त्याच्या दुरुस्तीबाबत लेखी आश्वासन मिळावे तसेच सद्या मंजूर केलेल्या इस्टेमेंट मध्ये सीड फार्म ते वाटंगी फाटा संताजी पुलासहीत या रस्त्याच्या दुरुस्ती काम मंजूर करावे शिवाय सदरचे आंदोलन थांबविले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील. ता. प्रमुख युवराज पवार, शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, जिल्हाप्रमुख युवा सेना महेश पाटील, सौ. वैशांली गुरव सरपंच बुरुडे, सौ. गीता देसाई, महिला आघाडी प्रमुख, उपतालुका प्रमुख संजय येसादे, सुनील डोंगरे, शिवाजी आढाव, चंदर पाटील, सुनिल बागवे उपसरपंच, बुरुडे, सौ. प्रमिला पाटील, उपसरपंच, हात्तिवडे, विलास, जोशिलकर,सरपंच, मेंढोली, उपशहर प्रमुख समीर चाँद, प्रमुख, विभाग प्रमुख दिनेश कांबळे, उपतालुका प्रमुख, युवासेना सुयश पाटील, सौ. गीता देसाई, महिला आघाडी प्रमुख, संजय कांबळे, ग्रा.पं. सदस्य, बुरुडे सह शिवसैनिक पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.