☔🌧️कोकण घाटमाथ्यावर आज पावसाचा जोर वाढणार
कोकण व घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी..
मुंबई :- प्रतिनिधी.
कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. राज्यात मात्र काही भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. आज कोकण, घाटमाथ्यासह पावसाचा जोर वाढणार असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
उर्वरित कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरी तसेच विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव, चंद्रपूर जिल्ह्यांत जोरदार पाऊस, तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
🟥रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट परिसरत, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाट परिसर यांसारख्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. याशिवाय उर्वरित कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरी तसेच विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांसाठ यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे.
तसेच कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटाकडील भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. तसेच उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.