Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम .- मडिलगेत ग्रामीण शेतकरी...

ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम .- मडिलगेत ग्रामीण शेतकरी मेळावा संपन्न.

ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम .- मडिलगेत ग्रामीण शेतकरी मेळावा संपन्न.

आजरा :- प्रतिनिधी

आजरा मडिलगे येथील ग्रामपंचायत मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित बहिरेवाडी (ता.आजरा) येथील रोशनबी शमनजी महाविद्यालयातील वतीने ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२५ – २६ ( खरीप ) ग्रामीण शेतकरी मेळाव्याचे आयोजन ग्रामपंचायत मडिलगे सहकार्याने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे अधिकारी अमरान शमनजी होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर व शेतकरी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.‌

महाविद्यालयीच्या वतीने उपस्थित मान्यवर सरपंच व शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. ए. एस. शिंदे शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले फक्त पुस्तकात वाचुन काम करु नये प्रत्यक्षात काम करुन अनुभव विद्यार्थ्यांनी देखील घ्यावे. शेतकरी काय करत आहे.‌आपण काय सांगत अहोत याकडे लक्ष द्यावे. शेतकऱ्यांच्या पिके चांगली यावी यासाठी ३५६ वेगवेगळ्या योजना आहेत. त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवायच्या आहेत.‌ तसेच माती शिवाय कोणतेही पिक येत नाही. माती सुपीक ठेवली तर जमीन सुपीक होते. व पीक चांगले येते. असे डॉ शिंदे म्हणाले.

सरपंच बापू निऊगरे म्हणाले शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेळावा आयोजित करून आपण जे ज्ञान देणार आहात एकमेकांना शिकता येणार आहे. पण यावेळी नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या नाहीत. आपण काही शेतकरी तयार करा ज्यांनी तुम्ही दिलेल्या माहितीनुसार चांगली शेती करुन त्यांनी आपला अनुभव दुसऱ्या शेतकऱ्यांना द्यावा. व सद्यस्थितीत शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे असे मत असे श्री. सरपंच निऊगरे यांनी व्यक्त केले.

राहुरी विद्यापीठाचे माजी प्रा. तुकाराम घूरे यांनी पिकांची वाढ, रोगाचा बचाव, बियांने प्रक्रिया, वेगवेगळ्या रोगावरील किटकनाशके, पिकांची चांगली वाढ होऊन चांगले उत्पन्न कसे मिळवावे याबाबतची शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.‌
मडिलगे कृषी सहायक मनिषा पाटील यांनी विविध योजनांची माहिती दिली.‌

ग्रामीण कृषी जागृती व औद्योगिक कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासह प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती दिली.‌

यावेळी सरपंच बापू निऊंगरे, स्मिता पाटील होन्याळी, जयश्री देसाई, रुपाली पाटील महागोंड, उपसरपंच पांडुरंग जाधव, शेतकरी महादेव शिमणे, श्री . भाईगंडे, सौ. देसाई, दत्तात्रय जाधव व कृषिदूत विशाल करांडे, अथर्व सोनवणे, राजेश कांबळे, सुशांत कोगनोळे, सुजल पोवार, शुभम गंगणे उपस्थित सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन विद्यार्थी सानिया हराळे, व श्रीधर पाटील यांनी केले. आभार अर्थव सोनवणे या विद्यार्थ्यांनी मानले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.