Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा - हाजगोळी बंधाऱ्यानजीक जीवघेण्या खड्ड्याला मुरूमाचा लेप.- जि. प. बांधकाम विभागाने...

आजरा – हाजगोळी बंधाऱ्यानजीक जीवघेण्या खड्ड्याला मुरूमाचा लेप.- जि. प. बांधकाम विभागाने तात्पुरती केली डागडुजी.

आजरा – हाजगोळी बंधाऱ्यानजीक जीवघेण्या खड्ड्याला मुरूमाचा लेप.- जि. प. बांधकाम विभागाने तात्पुरती केली डागडुजी.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील हाजगोळी बंधाऱ्यावरील स्लॅबच्या लोखंडी सळई बाहेर दिसत होत्या.
त्यामध्येच अति पावसाने धरणाच्या एक हात पलीकडे अति पावसाने काल मोठा खड्डा पडला..

या खड्ड्याला जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तात्पुरता मुरमाचा लेख दिला आहे.‌ व थांबलेली वाहतूक पुन्हा चालू केली असल्याचे समजते.

परंतु अति पावसाने सदर खड्ड्यांमध्ये टाकलेला मुरूम हा किती दिवस राहणार यासाठी ताबडतोब सदर झालेली रस्त्याची नादुरुस्ती ताबडतोड नाही केल्यास या खड्ड्यामुळे धरणाला धोका होऊ शकतो.

तसा तो खड्डा धरणावरतीच आहे. असं म्हणता येईल. पण धरणाच्या पलीकडे कठड्यानजीक एक हात पुढे असल्यामुळे.. जलसंपदा विभाग हा खड्डा मुख्यमंत्री सडक योजनेकडे असला तरी ती जबाबदारी आमची देखील आहे. असे म्हणणे असले तरी. सदर धरणावरती बाहेर आलेल्या धरणाच्या सळ्या यादेखील चालू असलेल्या पावसाळ्यात धोकादायक ठरू शकतात. यामुळे पडलेल्या खड्ड्याची व धरणावरील नवीन स्लॅब पुन्हा नव्याने करून धरणाला धोका होऊ नये याची दक्षता घ्यावी. अशी मागणी नागरिकांच्या कडून होत आहे.‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.