शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कृषी दिन व हेक्टरी १२५ मे टन, ऊस उत्पादन वाढ अभियान शुभारंभ.- आजरा प. स. सभागृहात कार्यक्रम संपन्न
आजरा.- प्रतिनिधी

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी आजरा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था आत्मा व पंचायत समिती आजरा यांच्या संयुक्त विद्यमानाने. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त व राजश्री शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कृषी दिन व हेक्टरी १२५ मे टन ऊस उत्पादन वाढ अभियान शुभारंभ मंगळवार दि १ रोजी पंचायत समिती सभागृह आजरा येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार समीर माने होते. तसेच सहअध्यक्ष सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, व ता. कृषी अधिकारी भुषण पाटील होते.

यावेळी नैसर्गिक व पारंपरिक शेती कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन राहुल टोपले यांनी दिले. तसेच भात शेती कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन प्रगतशील शेतकरी सूर्यकांत दोरुगडे यांनी केले. तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेबाबत ची माहिती जिल्हा संसाधन अशोक येलकर यांनी माहिती दिली.

यावेळी विविध योजनेतील पात्र लाभार्थी तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त संभाजी जाधव यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विविध योजनेतील पात्र लाभार्थी.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सन २०२४/२५ पात्र लाभार्थीं.- त्यांचे वारस.
१) कै. शिवाजी विष्णू माडभगत – साळगाव.- गीता शिवाजी माडभगत
२) कै. महादेव रामू पाटील.- मेंढोली .- सुगंधा महादेव पाटील
३) कै. रजाक बापू शेख.- साळगाव.- रुक्या रजाक शेख
४) कै. विमल निवृत्ती पाटील.- निवृत्ती राजाराम पाटील.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना लाभार्थी मंजुरी पत्र व काजू प्रक्रिया युनिट. लाभार्थी.
१) अभिजीत मारुती फडके.- सुळे
२) सुमन सुभाष कासार.- विनायकवाडी
३) संग्राम सुबराव सरदेसाई.- कासार काडगाव
४) विजय भाऊ वांगणेकर .- आर्दाळ.
५) स्वाती समीर चव्हाण.- पेद्रेवाडी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना.- विहीर खुदाई.
१) संजय सखाराम कांबळे.- अंबाडे. ४ लाख
२) मसनू सोमा कांबळे. लाटगाव.- ४ लाख
३) मारुती अर्जुन कांबळे.- देवकांडगाव.- ४ लाख
४) रत्नाप्पा अण्णाप्पा मांग.- गजरगाव. २.५ लाख.
पीक स्पर्धा खरीप हंगाम २०२४ अनुक्रमे क्रमांक.

भात. – प्रथम क्रमांक. बाळू दत्तू शिवणे.
भात.- द्वितीय क्रमांक. नानासो विठोबा चोरे पोश्रातवाडी,
भात तृतीय क्रमांक. मारुती कृष्णा चौगुले सरबळवाडी.
प्रथम क्रमांक नाचणी. प्रकाश बंडू सावंत मल्लीग्रे.
या कार्यक्रमाला कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती मधील बी. आर. दळवी, ए. बी. मासाळ, पृथ्वीराज चव्हाण, पी. ए माळी. पी. जी. पाटील, आर. डी. आगवणे सह
शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी तृप्ती पाटील यांनी केले. कृषी सेवक स्वामिनी दातीर त्यांनी मानले.
चौकट.
व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त व राजश्री शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कृषी दिन व हेक्टरी १२५ मे टन ऊस उत्पादन वाढ अभियानात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
