महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुंटुंब कल्याण मंत्री तथा पालक मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा भुदरगड राधानगरी विधानसभेचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुंटुंब कल्याण मंत्री तथा पालक मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांचा वाढदिवस ३० जून रोजी आजऱ्यात उत्साहात संपन्न झाला.

वाढदिवसानिमित्त निमित्य आजरा तालुका शिंदे शिवसेनेच्या वतीने आजरा शहरातील अनाथ मुलांना शालेय कीट वाटप नाम. प्रकाश आबिटकर यांच्या आजरा येथील संपर्क कार्यालयात करण्यात आला. तसेच सायंकाळी श्री राम मंदीर येथे त्यांना दिर्घायुष्य लाभण्यासाठी महा आरती करण्यात आली.

आजरा शिवसेना संपर्क कार्यालयात कोल्हापूर जिल्हा बँकचे संचालक अर्जुन आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलांच्या हस्ते केक कापून अनाथ मुलाना दप्तर छत्री जेवणाचा डबा, पाणी बॉटल, वहया, पेन, कंपास त्याच बरोबर इतर कीटचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत , तालुकाप्रमुख संजय पाटील, शहर प्रमुख विजय थोरवत, गारगोटी तालुकाप्रमुख संग्राम सावंत आत्मा कमीटी आजरा चे आध्यक्ष इंद्रजीत देसाई, कोअर कमीटीचे सर्व सदस्य रणजीत सरदेसाई, संतोष भाटले, नाथ देसाई, दीपक बल्लाळ, तेजस मोहिते, साळगाव सरपंच – धनंजय पाटील, माजी शहर प्रमुख, शैलेश पाटील, सुनील दिवेकर, विभाग प्रमुख मारुती डोंगरे, विजय कोंडुस्कर, मसोली सरपंच चंद्रकांत गुरव, असीफ पटेल, गौरव देशपांडे, सतीश बामणे, शरीफ खेडेकर, अमजद माणगावकर, आकाश पाटील

नितीन यादव, महेश दळवी, राजु दीक्षित, श्रीनयन थोरवत, सार्थक कुंभार, राहुल नेवरेकर ( जिल्हा धर्म प्रसारक) हर्षद सावंत, ( तालुका संयोजक बजरंग दल ) रुपेश निर्मळे तसेच गिरणी कामगार संघटना, बांधकाम कामगार संघटना, युवा सेना, माजी सैनिक संघटना आन्याय निवारण समिती आजरा चे प्रमुख जेष्ठ नागरीक व युवा सेनेचे पदाधिकारीउपस्थित होते आभार युवा सेना तालुका प्रमुख मंदार बिरंजे यांनी मानले.