🛑हिंदी भाषा सक्तीच्या जी.आर ची गडहिंग्लज उबाठा सेनेने केली होळी.
🛑 संयुक्त हिंदवी स्वराज्य ग्रुप – उत्तूर व कै मुकुंदराव दादा आपटे फौंडेशन उत्तूर यांच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न.
💥हिंदी भाषा सक्तीच्या जी.आर ची गडहिंग्लज उबाठा सेनेने केली होळी.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत हिंदी भाषा सक्ती साठी काढलेल्या जी.आर ची आज कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा.सुनिल शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज येथे होळी करण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख श्री शिंत्रे
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत हिंदी भाषा सक्ती साठी काढलेल्या जी.आर ची रद्द करावा अन्यथा कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. व सहा तारखेला होणाऱ्या मुंबई येथे या हिंदी भाषा सक्तीच्या विरोधातील मराठी भाषिकांच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग व्हावे असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित महिला जिल्हा संघटक शांता जाधव, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील ,सुरेश चौगुले, युवा सेना जिल्हाधिकारी अवधूत पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर तालुकाप्रमुख दिलीप माने, युवराज पवार ,जयसिंग टिकले, अजित खोत, बाबासाहेब पाटील, उत्तम पाटील, वसंत नाईक, सुरेश हेबाळे, समीर देसाई, प्रकाश रावळ, मनीष हावळ ,कृष्णात कांबळे, सागर भावके, संकेत रावण, ओंकार माध्याळकर, विक्रम मुतकेकर, मधुरा कांबळे, श्रद्धा शिंत्रे, सूमन देसाई, मधुरा जैन, रेखा पाटील ,कृष्णा पाटील, सुयश पाटील, श्रीशैलाप्पा साखरे, कृष्णा कांबळे, शैलेश इंगवले, राजू रामजी, बाबू नाईक, बाळू कुंभार, मारुती वाघराळकर, आप्पा सुतार, अर्जुन पाटील, आप्पा सुतार, मल्लाप्पा चौगुले, संभाजी येडूरकर, बाळू कडुकर, शंकर गवळी, बाळू सुपले, विशाल चव्हाण, तेजस घेवडे, सुमित कोरवी, कमलेश गोरुले, संतोष कदम तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित.

🛑 संयुक्त हिंदवी स्वराज्य ग्रुप – उत्तूर व कै मुकुंदराव दादा आपटे फौंडेशन उत्तूर यांच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न.
उत्तुर – वार्ताहर.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त संयुक्त हिंदवी स्वराज्य ग्रुप,उत्तूर व कै मुकुंदराव दादा आपटे फौंडेशन उत्तूर यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. संजीवन ब्लड बँक, कोल्हापूर या ब्लड बँकेला रक्तदान केले.

रक्तदान शिबिरामध्ये ९१ रक्तदात्यांनी रक्तदान कार्यात सहभाग नोंदवला व रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उदघाटन जि प. चे माजी अध्यक्ष उमेश आपटे, सरपंच किरण आमनगी , ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, संजय उत्तूरकर, भैरू कुंभार, मिलिंद कोळेकर व लेखक प्रकाश नावलकर यांच्या हस्ते झाले.

या रक्तदान शिबिरासाठी संग्राम घोडके, वैभव सावंत, सत्यजित देसाई, अमित येसादे, ओंकार उत्तूरकर, विनय उत्तूरकर, वेदांत मोरे, सतीश चोरगे, विजय वांद्रे, तुषार रावळ, अमोल बांबरे यांनी परिश्रम घेतले. रक्तदात्यांचे आभार संयुक्त हिंदवी स्वराज्य ग्रुप, व कै मुकुंदराव दादा आपटे फौंडेशन यांनी मानले.