Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र आजरा महाविद्यालय – प्रा. लता शेटे यांना भौतिक शास्त्रातील पीएचडी.

आजरा महाविद्यालय – प्रा. लता शेटे यांना भौतिक शास्त्रातील पीएचडी.

आजरा महाविद्यालय – प्रा. लता शेटे यांना भौतिक शास्त्रातील पीएचडी.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा महाविद्यालय, आजरा येथील प्रा.सौ.लता दिनेश शेटे यांनी भौतिकशास्त्रातील,” फोटो इलेक्ट्रो कॅटलेटिक डिग्रेडेशन ऑफ ऑरगॅनिक इम्प्युरिटीज युजिंग नॅनो क्रिस्टलाइन अल्युमिनियम डोपड कॅडमियम सेनेनाईड/टीटॅनियम डायॉक्साईड थीन फिल्म्स” या विषयातील शोधप्रबंध शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे सादर केला होता. या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाने त्यांना नुकतीच पीएच डी. पदवी प्रदान केली.

जल प्रदूषणास कारणीभूत असलेले प्रमुख उद्योग म्हणजे कागद, कापड, रासायनिक टॅनरी, पेट्रोलियम रिफायनरी, प्लॅस्टिक, डिटर्जंट, रंग इ. उद्योग, तसेच शेतीमधील रासायनिक खते, कीटकनाशके इत्यादी मधून बाहेर पडणारे सांडपाणी प्रक्रिया न करता तलाव, ओढे व नद्यांमध्ये टाकले जाते. “जल हेच जीवन” असे असताना पृथ्वीवरील मानवी जीवन व जैव वैविधता धोक्यात येणाऱ्या प्रमुख कारणांपैकी एक असलेले कारण म्हणजे प्रदूषित पाणी. याकरिता जागतिक स्तरावर वेगवेगळी संशोधने व प्रयोग सुरु आहेत. याच अनुषंगाने सांडपाण्यामध्ये असणारे सेंद्रीय, असेंद्रिय व इतर घटक जे मानवी आरोग्यास व जैववैविधतेस हानिकारक ठरत आहेत, अशा घटकांना पाण्यातून वेगळे करण्याच्या विविध पद्धती जगभरातील शास्त्रज्ञानी संशोधन करुन शोधल्या आहेत. यापैकी फोटोक्याटालायसिस ही अत्यंत प्रभावी पद्धती त्यांनी शोधली आहे. यामध्ये तयार होणारे सुपर ऑक्साइड रॅडिकल व हायड्रॉक्साइड रॅडिकल हे पाण्यात आढळणाऱ्या प्रदूषकांवर क्रिया करुन बिनविषारी घटकांमध्ये रूपांतरित करु शकतात.

Oplus_131072

या संशोधनामध्ये अल्युमिनियम डोपड कॅडमियम सेनेनाइड/टीटॅनियम डायऑक्साइड च्या थीन फिल्म्स च्या सहाय्याने कापड व कागद कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणारा मिथिलिन ब्ल्यू हा सेंद्रिय प्रदुषक पुर्णपणे सोप्या पद्धतीने काढून टाकण्यात यश मिळविले आहे.
टीटॅनियम डायऑक्साइड हे औद्योगिक व सौंदर्य प्रसाधन उद्योगांमध्ये उपयोगात येणारा महत्वाचा घटक आहे, जो पाणी शुद्धिकरणासाठी वापरला जातो. पण त्याचा एक महत्वाचा तोटा म्हणजे तो सूर्यप्रकाशात वापरता येत नाही. म्हणून त्याला या संशोधनात अल्युमिनियम डोपड कॅडमियम सेलेनाइड बरोबर जोडून ही पूर्ण जोडणी सूर्यप्रकाशात वापरण्यायोग्य बनविण्यात आली आहे. या शोधामुळे सांडपाणी शुद्धीकरणासाठी अपारंपरिक/ हरित ऊर्जा स्रोतांचा वापर करुन शाश्वत विकासातील “स्वच्छ पाणी सर्वांसाठी” हे ध्येय साद्य करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे.

सौ.शेटे यांचा या विषयाचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध झाला आहे. तसेच या विषयाचे संशोधन पोस्टर व पेपरही प्रकाशित झाले आहेत. प्रोफेसर डॉ. शिवानंद मस्ती, डॉ. घाळी कॉलेज गडहिंग्लज यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले. तसेच न्यू कॉलेज कोल्हापूर येतील भौतिकशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. श्री. महादेव शेडम,शिवराज कॉलेज चे प्रा.डॉ. राकेश शेडम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, कार्यालय अधिक्षक श्री. योगेश पाटील व जनता एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी व सर्व संचालक यांचेही सहकार्य व बहुमोल मार्गदर्शन लाभले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.