Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रकोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील प्रश्नांची स्वतंत्र चर्चा करावी.- वनमंत्री...

कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील प्रश्नांची स्वतंत्र चर्चा करावी.- वनमंत्री गणेश नाईक🛑मडिलगे ग्रा.पं.च्या. – भेटीसाठी कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित बहिरेवाडी- रोशनबी शमनजी कॉलेजचे कृषिदूत .

🛑कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील प्रश्नांची स्वतंत्र चर्चा करावी.- वनमंत्री गणेश नाईक
🛑मडिलगे ग्रा.पं.च्या. – भेटीसाठी कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित बहिरेवाडी- रोशनबी शमनजी कॉलेजचे कृषिदूत .

💥 मडिलगे ग्रा.पं.च्या भेटीप्रसंगी रोशनबी शमनजी कॉलेजचे कृषिदूत.

आजरा :- प्रतिनिधी

Oplus_131072

आजरा मडिलगे येथील ग्रामपंचायत मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित बहिरेवाडी (ता.आजरा) येथील रोशनबी शमनजी महाविद्यालयातील कृषिदूतांनी ग्रामपंचायतीला भेट दिली. ग्रामीण कृषी जागृती व औद्योगिक कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासह प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सरपंच बापू निऊंगरे, उपसरपंच पांडुरंग जाधव, शिपाई दत्तात्रय जाधव व सर्व कृषिदूत विशाल करांडे, अथर्व सोनवणे, राजेश कांबळे, सुशांत कोगनोळे, सुजल पोवार, शुभम गंगणे उपस्थित होते.

🛑कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील प्रश्नांची स्वतंत्र चर्चा करावी.- वनमंत्री गणेश नाईक

आजरा .- प्रतिनिधी.‌

Oplus_131072

कोल्हापूर वनवृत अधिकारी यांनी बैठक घेऊन कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील प्रश्नांची स्वतंत्र चर्चा करावी.
असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी काल पुणे येथे झालेल्या बैठकीत दिले. यावेळी राज्याच्या मुख्य वनसरंक्षक शौमिता बिस्वास, कॉ संपत देसाई, प्रतिभा शिंदे, अविनाश भाले, राजेंद्र कांबळे, किरण लोहकरे, राहुल कदम यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आदिवासी विकास केंद्राच्यावतीने शरद पवार यांच्या सुचनेनंतर आज पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि अहिल्यानगर येथील वन हक्कावर काम करणाऱ्या जनसंघटना आणि संस्थांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व्यापक बैठक बोलावली होती. वन हक्काचे दावे दाखल केल्यानंतर वनविभागाकडून योग्य सहकार्य मिळत नाही. कांही दावे रिजेक्ट केले जातात त्याबाबत सहकार्य करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.

आजरा, चंदगड, भूदारगफ, दोडामार्ग, सावंतवाडी या कर्नाटक हद्दी लगत असलेल्या तालुक्यात हत्तीकडून पिकांची मोठ्या प्रमाणात पिकांची नुकसान होत असते. हत्ती, गवे, सांबर, रानडुक्कर यासारख्या वन्य प्राण्यांपासून पिकांच्या नुकसानी बरोबर माणसांच्यावर हल्ले पण होत आहेत. त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यासंदर्भात कायमस्वरूपी ठोस उपाययोजना म्हणून जंगलाच्या समृद्धीकरणाची मोहीम हाती घेतली पाहिजे. याबाबत कोल्हापूर वनवृत अधिकारी यांनी कोल्हापूर सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी असे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.

याबरोबरच या बैठकीत वन हक्क दाव्यांच्या अडचणी सोडवून पालघरच्या धर्तीवर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात वेगाने या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी वनमंत्री श्री नाईक यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

बैठकीला कॉ संपत देसाई, प्रतिभा शिंदे, अविनाश भाले, राजेंद्र कांबळे, वैशाली पाटील, मनीषा पाटील, किरण लोहकरे, राहुल कदम यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती प्रकाश मोरुस्कर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.