Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा.- उबाठा सेनेचे तहसीलदार यांना निवेदन.

आजरा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा.- उबाठा सेनेचे तहसीलदार यांना निवेदन.

आजरा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा.- उबाठा सेनेचे तहसीलदार यांना निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील उभाठा सेनेच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करावा याबाबत उबाठा सेनेचे तहसीलदार यांना निवेदन. देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.‌

२०२५ सालात आजरा तालुक्यामध्ये मे महिन्यापासूनच पावसाचे प्रमाण जास्त झाले तसेच जून महिन्यात तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. प्रकल्प भरुन ओव्हरफ्लो झाले. पण अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या राहील्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी भात, नाचना, भुईमूग पेरला त्यांचे सर्व पीक अतिपावसामुळे कुजून, खराब होवून गेलेले आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार आहे.

तरी तालुक्यातील या शेतकऱ्यांचे पंचनामे करुन योग्य ती नुकसान भरपाई मिळावी व आजरा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर युवराज पोवार तालुका प्रमुख, संभाजी पाटील उपजिल्हा प्रमुख, सुयश पांटील तालुका संघटक, युवासेना, महेश पाटील उपजिल्हा प्रमुख, युवासेना, ओमकार माद्याळकर शहर प्रमुख, दिनेश काबळे विभाग प्रमुख, बाळासो परीट, नारायण कांबळे, शिवाजी पोवार सह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.