Homeकोंकण - ठाणेउद्धव ठाकरेंचे जाहीर युतीचे संकेत मात्र मनसेची अजूनही सावध भूमिका

उद्धव ठाकरेंचे जाहीर युतीचे संकेत मात्र मनसेची अजूनही सावध भूमिका

🟥उद्धव ठाकरेंचे जाहीर युतीचे संकेत मात्र मनसेची अजूनही सावध भूमिका

मुंबई :- प्रतिनिधी.

शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संदेश देण्यासोबतच उद्धव ठाकरे यांनी एका संवेदनशील विषयावरही भाष्य केलं. हा विषय आहे. दोघा ठाकरे बंधुंच्या युतीचा कोणतीही मोठी निवडणुक आली की ठाकरेंच्या मनोमिलनाची चर्चा अगदी फिक्स असते. यावेळीही तसंच होतंय. पण आता पालिकेच्या तोंडावरही दोन्ही भावांच्या एकत्र येण्याची तुफान चर्चा आहे. ही चर्चा कोणतं वळण घेणार हे जरी ठाऊक नसलं तरी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून युतीची दिशा स्पष्ट केली आहे.

🟥गेल्या पंधरा दिवसातलं उद्धव ठाकरेंचं राज यांच्यासोबतच्या युतीबाबत मेळाव्यात महाराष्ट्राच्या मनात आहे तेच करेन असे म्हणत दुसऱ्यांदा सकारात्मक विधान केले. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवसैनिक असोत, राजकीय पक्ष असोत किंवा मग माध्यमं, सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीकडे होते ती म्हणजे मनसेसोबतच्या युतीबाब उद्धव ठाकरेंची भूमिका. लोकांच्या मनातली ही भावना लक्षात घेत उद्धव ठाकरे यांनी अगदी चाणाक्षपणे या युतीबाबत सकारात्मक उल्लेख करत राजकीय पटलावर दोन भावांच्या युतीबाबत स्मार्ट खेळी खेळली आहे.

🔴गेली जवळपास दोन दशकं ठाकरे बंधूंची युती हा राज्याच्या राजकारणातला कधीही शिळा न होणारा विषय आहे. कारण ते दोघे ठाकरे आहेत. बाळासाहेब ठाकरे या नावाचं वलय त्या दोघांच्या भोवताली आहे. मराठी माणसाचं ठाकरे या आडनावाशी एक भावनिक नातं आहे. थोडक्यात ठाकरे केवळ एक कुटुंब नाही तर तो ब्रँड आहे. आणि याच ब्रँडचा उल्लेख करत उद्धव यांनी आपल्या राजकीय शत्रूंना थेट इशारा देतानाच दुसरीकडं राज ठाकरेंनाही भावनिक साद घातली आहे.

🟥दोन भावांची युती हा अनेक ठाकरे प्रेमींसाठी राजकीय नाही तर भावनिक विषय आहे. पण राजकारण फक्त भावनांवर चालत नाही, त्यात प्रॅक्टिकल रहावं लागतं. त्यामुळे ही युती व्हावी अशी अनेकांची इच्छा असली तरी दोन भावांच्या निर्णयात सल्लागाराची भूमिका निभावताना सध्या तरी कोणी दिसत नाही. त्यामुळे मनसेच्या बाजूनेही कुणी सेफ झोन सोडलेला नाही. पालिकेची यंदाची निवडणुक दोन्ही ठाकरेंसाठी राजकीय अस्तित्वाची आहे. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी दोन्ही ठाकरे शिवतीर्थ आणि मातोश्रीमधलं अंतर कमी करतात की राजकीय अपरिहार्यतेमुळे त्यांच्या वाटा वेगळ्याच राहतात? हे पाहावं लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.