Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा - व्यंकटराव संकुलात योग दिन उत्साहात संपन्न.

आजरा – व्यंकटराव संकुलात योग दिन उत्साहात संपन्न.

आजरा – व्यंकटराव संकुलात योग दिन उत्साहात संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला
प्राचार्य एम एम नागुर्डेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, दररोज योगा केल्याने माणसाचे जीवन निरोगी, आनंदी व उत्साही राहून विद्यार्थ्यांना अभ्यासात त्याची निश्चितच मदत होते. मन, मेंदू व शरीर सदृढ ठेवायचे असेल तर विद्यार्थीदशेपासूनच दररोज योगासन तसेच प्राणायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे. पुरातन काळापासून हिंदू संस्कृतीमध्ये योगाचे महत्त्व सांगितले आहे. त्याचे महत्त्व जाणून जगातल्या इतर देशांनी त्याचा आपल्या जीवनात अंगीकार केला आहे.

पण आपल्या देशातील विद्यार्थी व नागरिकांना त्याचे महत्त्व पटवून द्यावे लागत आहे.. त्यामुळे आज फक्त एक दिवस योगा न करता दररोज नित्यनेमाने प्रत्येकाने किमान अर्धा तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी आणि योगासनासाठी द्यावा.

असे त्यांनी सांगितले. व आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
क्रीडा शिक्षक सुनील पाटील यांनी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना ढोल ताशा यांचे साह्याने योग प्रात्यक्षिक करून दाखवून त्यांचे कडून करवून घेतले. व प्रत्येक योगासनाचे महत्त्व सांगितले.

प्रास्तविक प्रकाश पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे शेलार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.