लाचखोर नायब तहसीलदार कांचन कांबळे ४० हजाराच्या लाच प्रकरणी अटकेत…
संभाजीनगर.- प्रतिनिधी.
राज्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यां पासून लाचखोरीचा चांगलाच सपाटा लावला असून आता महसूल विभागातील महिला अधिकारी सुद्धा आम्ही पुरुषांच्या मागे नाही. हे दाखवून देत असून केवळ तलाठी किंवा महसूल सहाय्यकच नाही. तर नायब तहसीलदार या पदावर कार्यरत महिला अधिकारी सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने लाचखोरीच्या प्रकरणांत एसीबीच्या सापळ्यात अडकत आहेत.
याचीच प्रचिती काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तहसील कार्यालयात आली असून पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कांचन कांबळे नामक महिला नायब तहसीलदाराला एसीबीने ४० हजाराची लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगेहाथ अटक करून लाचखोरीचा गुन्हा दाखल केल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार रास्त भाव दुकान क्र.२९, मौजे काटेपिंपळगाव (ता. गंगापूर) येथील आजोबाच्या नावे असलेल्या दुकानाच्या प्राधिकारपत्राचा निलंबन प्रस्ताव मागे घेण्यासाठी कांचन कांबळे यांनी स्वतःसाठी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी तक्रार दिली होती.
दिलेल्या तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असता कांचन कांबळे यांनी ७० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर स्वतःसाठी १५, तर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसाठी २५ हजार अशी लाचेची मागणी तडजोडीअंती मान्य करून लाच रक्कम छत्रपती संभाजीनगर शहरात स्वीकारण्याचे गंगापूर येथे पंचांसमक्ष मान्य केले होते.
राज्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यां पासून लाचखोरीचा चांगलाच सपाटा लावला असून आता महसूल विभागा तील महिला अधिकारी सुद्धा आम्ही पुरुषांच्या मागे नाही हे दाखवून देत असून केवळ तलाठी किंवा महसूल सहाय्यकच नाही तर नायब तहसीलदार या पदावर कार्यरत महिला अधिकारी सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने लाचखोरीच्या प्रकरणांत एसीबीच्या सापळ्यात अडकत आहेत.
याचीच प्रचिती काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तहसील कार्यालयात आली असून पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कांचन कांबळे नामक महिला नायब तहसीलदाराला एसीबीने ४० हजाराची लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगेहाथ अटक करून लाचखोरीचा गुन्हा दाखल केल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार रास्त भाव दुकान क्र.२९, मौजे काटेपिंपळगाव (ता. गंगापूर) येथील आजोबाच्या नावे असलेल्या दुकानाच्या प्राधिकारपत्राचा निलंबन प्रस्ताव मागे घेण्यासाठी कांचन कांबळे यांनी स्वतःसाठी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी तक्रार दिली होती.
दिलेल्या तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असता कांचन कांबळे यांनी ७० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर स्वतःसाठी १५, तर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसाठी २५ हजार अशी लाचेची मागणी तडजोडीअंती मान्य करून लाच रक्कम छत्रपती संभाजीनगर शहरात स्वीकारण्याचे गंगापूर येथे पंचांसमक्ष मान्य केले होते.
लाच मागणी पडताळणी अंती शनिवारी रेल्वे स्टेशनच्या बाजूला वस्तू व सेवाकर भवनच्या गेटवर एसीबीकडून सापळा लावण्यात आला होता. दरम्यान, ३२ वर्षीय तक्रारदाराकडून कांचन कांबळे यांनी लाचेची रक्कम स्वीकारली असता रंगेहाथ एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.
कांचन कांबळेंकडे दोन मोबाइल, गाडीच्या डिकीत लाचेची रक्कम ४० हजार रुपये तसेच पर्समध्ये तीन हजार रुपये सापडले. छत्रपती संभाजीनगरच्या वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक वाल्मीक कोरे, सहायक सापळा अधिकारी पोलिस उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे, राजेंद्र जोशी, डोंगरदिवे, सी.एन.बागुल, पुष्पा दराडे, आशा कुंटे यांनी ही कारवाई केली.