नुतन जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी.- सत्कार सोहळा.
आजरा. प्रतिनिधी.३१
आजरा येथील महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचा शनिवार दि. ३१ रोजी सकाळी ठीक ९.३० वा. आजरा प्रशालेमध्ये श्री. शिंपी यांची जिल्हा परिषद कोल्हापूर उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित सर्व शाळा व्यंकटराव हायस्कूल व जूनियर कॉलेज आजरा, भादवण हायस्कूल भादवण, आदर्श हायस्कूल शिरसंगी, श्री रवळनाथ हायस्कूल देवडे, गर्ल्स हायस्कूल आजरा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. तरी याप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय असल्याचे अवाहन प्राचार्य श्री एस बी गुरव व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा यांनी महाल शिक्षण मंडळाच्या वतीने केले आहे.