मुंबई. प्रतिनिधी.३०
तळीये येथील नागरिकांना आणि दुर्घटनास्थळी बचावकार्यात योगदान दिलेल्या तळीये खालचीवाडी व बारसगाव गावातील युवकांना डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून ८० जणांना TT धनुर्वात इंजेक्शन आणि आरोग्य तपासणी व औषध वाटप.
राज्याचे नगरविकास मंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब, खा डॉ श्रीकांतजी शिंदे आणि ठाणे शहराचे महापौर श्री नरेशजी म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली महाड तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन
महापौर श्री नरेशजी म्हस्के, ठाणे शिवसेना शहरप्रमुख श्री हेमंत पवार, नगरसेवक श्री सुधीर कोकाटे, युवा सेना अधिकारी श्री निखिल बुडजडे यांची आरोग्य शिबिराला भेट
तळीये मधलीवाडी / बारसगाव (ता.महाड जि रायगड)
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये मधलीवाडी या गावात दरड कोसळल्याने संपूर्ण गाव अक्षरशः उध्वस्त झालं. मात्र या संकटाच्या काळात तळीये खालचीवाडी आणि बारसगाव येथील युवकांनी प्रसंगीं स्वतःचा जीव धोक्यात घालून बचावकार्यात सहभाग घेतला आणि मदतकार्य केलं. दुर्घटनाग्रस्त भागात बचावकार्य करताना , मृतदेह काढतांना अनेक युवकांना पायाला लोखंडी खिळे, काचा , छोटे दगड लागल्या होत्या. दुर्घटनाग्रस्त गावात भेट दिल्याने ही बाब राज्याचे नगरविकास मंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ठाणे शहराचे महापौर श्री नरेशजी म्हस्के यांच्या लक्षात आली. यावेळी या दोन्ही नेतेद्वयींनी या गावांत आरोग्य शिबिरे घेण्याचे आदेश शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या टीम ला दिले.
यानुसार शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून
दुर्घटनाग्रस्त तळीये मधलीवाडी येथील नागरिकांना आणि दुर्घटनास्थळी बचावकार्यात योगदान दिलेल्या तळीये खालचीवाडी व बारसगाव गावातील युवकांची आरोग्य तपासणी करून ८० पेक्षा अधिक जणांना TT धनुर्वात इंजेक्शन देण्यात आले. तसेच पावसामुळे उद्भवलेल्या चिखल्या रोगावरील औषध आणि मलम वाटप करण्यात आले.
सदर आरोग्य शिबिरांना ठाणे शहराचे महापौर श्री नरेशजी म्हस्के, ठाणे शिवसेना शहरप्रमुख श्री हेमंत पवार, नगरसेवक श्री सुधीर कोकाटे, युवा सेना अधिकारी श्री निखिल बुडजडे यांनी आरोग्य शिबिराला सदिच्छा भेट दिली.
या आरोग्य शिबिराला डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनचे विश्वस्त डॉ.जे.बी.भोर (सर) यांनी वैद्यकीय सेवा दिली. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या विशेष आरोग्य पथकाने महाड आणि चिपळूण शहरात तर नवी मुंबईचे महापालिकेच्या विशेष आरोग्य पथकाच्या माध्यमातून चिपळूणमधील ग्रामीण भागांत विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे घेण्यात येत आहेत.
राज्याचे नगरविकास मंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे, खा डॉ श्रीकांतजी शिंदे आणि ठाणे शहराचे महापौर श्री नरेशजी म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली महाड आणि चिपळूण मधील शहर आणि ग्रामीण भागात गेल्या ६ दिवसांपासून आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
