उदगीर. प्रतिनिधी.
शिक्षण हेच मानवी जीवनाला आकार देण्यासाठीचे प्रमुख हत्यार आहे, तेंव्हा सर्व मुला-मुलीनी विशेषतः उपेक्षित समाजातील सर्व आव्हानाशी संघर्ष करून जिद्दीने १८ वर्षापर्यंत शिकलेच पाहिजे, त्यानंतरच संसार, कमाई याचा विचार करावा असे प्रतिपादन श्रीमती ज्योतीताई राठोड यांनी केले.
साधना हॉटेल, उदगीर येथे क्राय संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने कलापंढरी संस्था, लातूर यांच्या वतीने उदगीर तालुक्यतील ५० गावातून बालविवाहाचे प्रमाण कमी करणे या प्रकल्पाचा प्रारंभ कार्यक्रम मा. कुमार निलेंदू जनरल मॅनेजर , पश्चिम विभाग क्राय इंडिया यांच्या अध्यक्षतेखाली दि. २७ जुलै रोजी उदगीर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर, मा. डॉ. लोहकरे (वैध्यकीय अधिकारी), मा. श्री धम्मानंद कांबळे (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, लातूर), मा. सौ. सविता कुलकर्णी (सदस्या, बाल कल्याण समिती, लातूर), मा. डॉ. दत्तात्रय पवार (वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, उदगीर), मा. श्रीमती एस. के. कलशेट्टे (विस्तार अधिकारी, सांख्यिकी, म. बा. उदगीर), मा. श्री श्रीकांत श्रीमंगले (तालुका अभियान व्यवस्थापक, MSRLM, उदगीर), online च्या माध्यमातून मा. सौमिता दास राज्य प्रमुख, महाराष्ट्र राज्य, CRY, India आणि मा. राम चंद्र, क्षेत्रीय व्यवस्थापक, CRY, Mumbai आदी मान्यवर उपस्थित होते.
मा. डॉ. लोहकरे यांनी बोलत असताना किशोरी मुलींसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यासाठीचा मानस व्यक्त केला, गाव स्तरावरील सर्व यंत्रणा संस्थेच्या कार्याकार्त्याना आवश्यक ती सर्व मदत करण्यासठी चे आश्वासन मा. डॉ. दत्तात्रय पवार यांनी दिले. उमेदच्या गटांच्या मध्यमातून सर्व पालकांपर्यंत पोहचून सर्वोतपरी मदत कारण्याचे आश्वासन मा. श्री श्रीकांत श्रीमंगले यांनी दिले. जिल्हा बाल सरक्षण कक्ष करत असलेले कार्य आणि जिल्हा व तालुका स्तरावरील बाल संरक्षण योजना यांनी मिळून कार्य केले तर बालकांच्या समस्या संपवण्यास मदत मिळेल असे प्रतिपादन मा. धम्मानंद कांबळे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले. मा. सौ. सविता कुलकर्णी, सदस्या, बाल कल्याण समिती यांनी बालकांच्या समस्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठीचे उपाय या संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान जुन्या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील किशोरी मुलीनी कलापंढरी संस्थेचे कार्य सुरु होण्या अगोदरच्या समस्या त्यांचे आयुष्य आणि संस्थेचे कार्य सुरु झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात झालेले बदल या विषयी थोडक्यात माहिती दिली, तसेच बालकांच्या अधिकारावरील गीत सादर केले.
श्रीमती राठोड या कार्यक्रमाच्या उद्घाटक या स्थानावरून बोलत होत्या, पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, बालविवाहा सारखी जठील समस्या मुलींच्या जीवनात घडत आहे परंतू यामुळे त्यामुलीच्या प्रगतीचे सर्व द्वारे थांबली जात आहेत. यासाठी पालक शासनाचे विविध विभाग व कलापंढरी सारख्या संस्थांनी एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे आहे, जि.प.च्या महिला व बालविकास विभाग सर्व प्रक्रियेत सहकार्य करेल असे आश्वासन दिले. या कार्यशाळेमध्ये बालविकासाचा आराखडा तयार झाला आहे. सर्व विभागाच्या प्रतिनिधींनी समन्वय बैठक घेऊन गाव पातळीवर मुलींसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्याचे ठरले. आजच्या कार्यशाळेत एकूण १७ किशोरी मुली सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती प्रतीक्षा होनराव यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष श्री. बी.पी. सूर्यवंशी यांनी केले तर आभार कार्यक्रम व्यवस्थापक शिवदर्शन सदाकाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिरुद्ध जंगापल्ले, मनोज तवंडे, सद्दाम शेख, बाळकृष्ण स्वामी, अपेक्षा वाघमारे, मिलिंद कांबळे, श्रीधर गायकवाड, बालाजी सुरवसे, बाबासाहेब कांबळे आणि जयवंत जंगापल्ले यांनी परिश्रम घेतले.