Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा तालुक्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या शाळांसह, गवसे प्राथमिक आरोग्य केंद्र विविध...

आजरा तालुक्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या शाळांसह, गवसे प्राथमिक आरोग्य केंद्र विविध ठिकाणी भेटी.🛑आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघ व पंचायत समीती मतदार संघाबाबत.- महासंघाचे निवेदन.

🛑आजरा तालुक्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या शाळांसह, गवसे प्राथमिक आरोग्य केंद्र विविध ठिकाणी भेटी.
🛑आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघ व पंचायत समीती मतदार संघाबाबत.- महासंघाचे निवेदन.

🛑आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघ व पंचायत समीती मतदार संघाबाबत.- महासंघाचे निवेदन

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका अत्यंत मागास व डोंगराळ व विकासापासून चंबीत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये स्वातंत्र्यानंतर तालूक्याला एकच वेळ आमदार मिळाले त्यामुळे तालुक्याचा आमदार नसल्यामुळे तालुका विकासापासून वंचीत राहीला आहे. याकडे सातत्याने शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. महात्मा गांधीच्या विचारानुसार शहराकडून खेड्याकडे जाऊन खेड्यांचा विकास करावा असे असतांना शासनाचे त्याप्रमाणे कामकाज होताना दिसत नाही.

सद्या शासनाने लोकसंस्खेच्या आधारावर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा आमदार शहरामध्ये जास्त असून शहरांचा विकास होत चालला आहे. पण खेडयांचा विकास थांबला आहे. यासाठी प्रत्येक तालुक्याला एक आमदार हवा असताना सुद्धा तसे होताना दिसत नाही.

शासनाने जिल्हा परीषद व पंचायत समीतीचे निवडणूकीसाठी आजरा तालूक्यामध्ये १९९० च्या दशकापर्यंत जिल्हा परीषदेचे ४ मतदार संघ होते. व पंचायत समीतीचे ८ मतदार संघ होते. पण नंतर शासनाने अचानक जिल्हा परीषदेचे ३ मतदार संघ पंचायत समीतीचे ६ मतदार संघ केले पण परवा अचानक शासनाने जिल्हापरीषदेचे २ मतदार संघ व पंचायत समीती ४ मतदार संघ झालेले पेपरच्या बातमीवरून कळाले आहे.‌ यावरून शासन आजरा तालुक्यावर कायमपणे अन्याय करतच आहे. त्यामुळे तालुक्यातील लोक आत्ता यापुढे अन्याय सहन करणार नाहीत याची नोंद घ्यावी. याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघ आजरा तालुका यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

आजरा तालुक्यातील लोकसंख्या शारानाव्या आकडेवारी नुसार १,०२,९५६ इतकी आहे 20याचप्रमाणे गगणबावडा तालुक्यातील लोकसंख्या ३५,७७२ इतकी असूनही गगणबावडा येथेजिल्हापरीषदेचे २ मतदार संघ व पंचायत संगीतीचे ४ मतदार संघ शासनाने चालु ठेवले आहेत. पण आजरा तालुक्याची लोकसंख्या १,०२,९५६ असताना पुर्वीप्रमाणेच आजरा तालूक्याचे ३ जिल्हा परिषदेचे व ६ पंचायत समीतीचे मतदार संघ राहीलेच पाहीजेत अशी सर्वांची न्याय मागणी आहे.
आजरा तालुक्याचा पश्चिम भाग अजुनही विकासापासून वंचीत आहे. पश्चिम भागातील गावे, वाड्या, वस्त्या, धनगरवाडे, ही अजूनही विकासापासून वंचीत आहेत हा भाग प्रवाहामध्ये येण्यासाठी यापुर्वी असणारा तालुक्यातील तिसरा पेरणोली जिल्हा परीषद मतदार संघ तसाच ठेवुन गवसे व पेरणोली असे दोन पंचायत समीती मतदार संघ कायम ठेवून आजरा तालुक्यावर होणारा अन्याय दूर करावा.

आजरा तालूक्यामध्ये पुर्वीप्रमाणे उत्तूर जि. प. कोळींद्रे जि. प. व पेरणोली जि. प. हे तिन्ही मतदार कायम ठेवून उत्तूर, भादवण, गजरगांव, कोळींद्रे पेरणोली व गवसे असे पंचायत समितीचे मतदार संघ कायम ठेवावेत यासाठी आमच्या आजरा तालूक्याच्या लोकप्रतिनिधींनी विशेष काळजीपुर्वक व्यक्तीगत लक्ष घालून आजरा तालूक्यावर होणरा अन्याय दूर करावा.

याबाबत योग्य निर्णय झाला नाहीतर तालुक्यातील जनतेमध्ये उद्रेक होऊन वेगवेगळी आंदोलने सनदशीर मार्गाने होतील शेवटचा पर्याय म्हणजे येथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणूकामध्ये मतदानावर बहिष्कार टाकला जाईल या गोष्टीचा गांभीयाने विचार करून पुर्वीप्रमाणे जिल्हा परीषदेचे ३ व पंचायत समीतीचे ६ मतदार संघ चालु ठेवण्यात यावेत असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, तालुकाध्यक्ष पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

🛑आजरा तालुक्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या शाळांसह विविध ठिकाणी भेटी.

विद्या मंदिर शेळप शाळेस जिल्हाधिकारी मा.अमोल येडगे यांची भेट.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

राज्यात शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सवाची शाळेत लगबग सुरू होती. पावसाच्या सरी मुक्तपणे कोसळत होत्या. तेंव्हाच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आगमन झाले. एखाद्या किल्ल्यात प्रवेश करत आहोत असेच शाळेचे प्रयोजन आहे. शाळेची बाग ,परिसर, परसबाग पाहून आनंद वाटावे असे आहे. त्यानंतर शाळेतील वर्गखोल्या, पट, विद्यार्थी, शिक्षक याविषयी माहिती घेतली. यावेळी इयत्ता पहिली व चौथीच्या वर्गाला भेट दिली. वर्गातील आकर्षक बोलक्या भिंती पाहून आनंदित झाले. मुलांशी संवाद साधला. मुलांशी बोलताना जिल्हाधिकारी श्री येडगेसोआपुलकीने बोलत होते. त्यामुळे मुलांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद दिला. मुलांनी न घाबरता साहेबांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. मुलांना आपण जिल्हाधिकारी साहेबांशी बोलत आहोत हे माहित नसल्याने मुले निरागसपणे बोलत होती. मुलांचे खूप कौतुक केले. मुलांशी संवाद साधण्याचे कौशल्य पाहून आम्ही सर्वजण अचंबित झालो. शालेय परिसर, वर्गखोल्या अतिशय सुंदर व बोलक्या असल्याने एकंदरीत शालेय कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.

यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी हरीश सूळ, आजऱ्याचे तहसीलदार समीर माने, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई , गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव,मंडल अधिकारी सौ.गीता कुंभार मॅडम,शेळप गावचे सरपंच अर्जुन बागडी साहेब,सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक सानप साहेब, पोलीस पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषाआजगेकर मॅडम,अध्यापक संभाजी बापट सर,सौ. अर्चना पाटील मॅडम विषय शिक्षक परमेश्वर नलवडे सर, ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट

जिल्हाधिकारी अमोल येडगे सर यांची गवसे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट. उपस्थिती प्रांताधिकारी हरिष सुळ, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संजय धमाल, प्रमुख डॉ. श्री. गुरव, सरपंच रेखा पाटील, उपसरपंच अविनाश हेब्बाळकर, विक्रम गदळे, दर्शन भालेराव, इतर स्टाफ आणि भागातील आशा वर्कर उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.