Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रवाड्यावरील ओढ्याच्या पाण्यातून मार्ग काढत.- किटवडे धनगरवाडा शाळेस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची...

वाड्यावरील ओढ्याच्या पाण्यातून मार्ग काढत.- किटवडे धनगरवाडा शाळेस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट.-

वाड्यावरील ओढ्याच्या पाण्यातून मार्ग काढत.- किटवडे धनगरवाडा शाळेस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट.-

आजरा.- प्रतिनिधी.

राज्यातील शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आजरा तालुक्यातील किटवडे धनगरवाड्यावर ओढ्याच्या पाण्यातून मार्ग काढत शाळेला भेट दिली.

त्यावेळी ‘Digital Classroom’ चे उद्‌घाटन जिल्हाधिकारी श्री येडगे यांचे शुभहस्ते करणेत आले. तसेच ‘STORY BOOK’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी मान्यवर मंडळीच्या शुभहस्ते सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश वाटप करण्यात आले. त्यावेळी मुलांनी विविध गाणी, नाटके सादर केली.

त्यावेळी भुदरगड – आजराचे प्रांताधिकारी हरीश सुळ, तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, गटविकास अधिकारी संजय धमाळ, गट शिक्षणाधिकारी बसवराज गुरव, अभियंता संभाजी गाडीवड्‌ड, केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई, आजरा शुगरचे संचालक गोविंद पाटील सरपंच लहू वाक्कर, उपसरपंच पाटील, ग्रामसेवक रवी कोबळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

तहसील विभागामार्फत सर्व विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक उत्तम कोकीतकर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.