Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमोफत आरोग्य शिबिरे ही काळाची गरज.- सौ.भारती डेळेकर, ( सरपंच ग्रुप ग्रा.पं...

मोफत आरोग्य शिबिरे ही काळाची गरज.- सौ.भारती डेळेकर, ( सरपंच ग्रुप ग्रा.पं सोहाळे – बाची. )

मोफत आरोग्य शिबिरे ही काळाची गरज.- सौ.भारती डेळेकर, ( सरपंच ग्रुप ग्रा.पं सोहाळे – बाची. )

आजरा.- प्रतिनिधी.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही. अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात. यासाठी सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करने गरजेचे आहे. सोहाळे – बाची येथे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली प्रसंगी सरपंच भारती डेळैकर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित शिबिरात बोलत होत्या.

यावेळी बोलताना म्हणाल्या आजारपणाचे निदान होऊन डॉक्टरांना उपचार करणे शक्य होते. सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासविण्याचे काम ग्रुप ग्रामपंचायत सोहाळे बाची व देसाई हॉस्पिटल कार्डियाक केयर सेंटर गडहिंग्लज यांच्या सहकार्यातून व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मौजे सोहाळे येथील सुप्रभात वाचनालय सोहाळे या ठिकाणी संपन्न झाले या शिबिरात मौ. सोहाळे, बाची, सोहाळेवाडी येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबिरामध्ये मोफत हृदयरोग, मूत्ररोग व नेत्ररोग निदान करून रक्त व लघवी तपासणी व ईसीजी मोफत करण्यात आली. तसेच शिबिराचे औचित्य साधून ग्रामस्थांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड चे वाटप करणेत आले.


आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले असल्याचे प्रतिपादन ग्रामपंचायत सोहाळे च्या वतीने सरपंच सौ. भारती डेळेकर यांनी यावेळी केले. प्रसंगी सोहाळे गावचे उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, ग्रामस्थ, देसाई हॉस्पिटल गडहिंग्लज कडील वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफ व सुप्रभात वाचनालय चे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.