🛑मागणीच नसताना स्मार्ट मिटर बसविणेची जबरदस्ती का? स्मार्ट मिटर बसविणे थांबवा. आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने दिले निवेदन
🛑मलिग्रे कागिणवाडी रस्तावर गसरगुंडीचा खेळ.- रस्त्यावर चिखलाचा साम्राज्य..
आजरा.- प्रतिनिधी.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत आजरा गडहिंग्लज चंदगड तालुक्यातील गावामध्ये नादुरुस्त मिटरचे ठिकाणी नवीन स्मार्ट मिटर बसविण्यात येत आहेत. जर ग्राहकानी विरोध केलेस तुमचा विज पुरवठा बंद पडणार अशी भिती घातली जात आहे. याबाबत आजरा येथील अन्याय निवारण समितीने महावितरण ला निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
स्मार्ट मिटर बसविलेल्या ठिकाणी चालु बिले दोन ते अडीचपट जास्त येत असलेचे ग्राहकांनी निदर्शनास आणून देण्यात आले
परंतु याकडे विद्धूत वितरण कंपनी दुर्लक्ष करुन सर्व बिल भरणेसाठी भाग पाडत आहे
तेंव्हा स्मार्ट मिटरचे अचुकते विषयी शंका. यामुळे अरोग्यावर होणारे परिणाम व मिटर बसविणेत येणारा खर्च अप्रत्यक्ष ग्राहकावर लादला जाण्याची शक्यता आहे.
तरी स्मार्ट मिटर बाबत असणारी शंका याबाबत पुरेशी स्पष्ट माहिती दिली जात नाही तेंव्हा ग्राहकांच्या परवानगी शिवाय स्मार्ट मिटर बसविणे चे काम त्वरीत थांबवावे याबाबत आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती तर्फे आजरा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला. देण्यात आले. यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित होते
🛑मलिग्रे कागिणवाडी रस्तावर गसरगुंडीचा खेळ.- रस्त्यावर चिखलाचा साम्राज्य..
आजरा.- प्रतिनिधी

पावसाळ्यात ओढ्यावरील पुल बांधकामामुळे वाहन धारकांची कसरत मलिग्रे कागिणवाडी रस्त्यावर गावा नजीक असलेला गुराळकीचा ओढ्यावर जुना पुल काढून नवीन विस फुट उंचीचा व दोन्ही बाजूना भराव घालून यु आकारात असणार्या रस्त्याचे व पुलाचे बांधकाम मार्च पासून सुरु केले आहे. बांधकामाची व अवकाळी पावसाची एकच धांधल सुरु झाल्याने, ओढ्याच्या पलिकडे असणार्या खडकवाडी कागिणवाडी व वाहनधारकाना कसरत करावी लागत आहे.
पुलाच्या भरावासाठी कागिणवाडी पासून आनलेली माती रस्त्यावर पडल्याने मलिग्रे कागिनवाडी रस्त्यावर गाड्या घसरून अपघात होत आहेत. गेल्या पंद्रा दिवसापासून कागिणवाडी एस टी वाहतूक पुर्ण पणे बंद असल्यामुळे पायी प्रवास करावा लागत आहे खडकावरील लोकांना सकाळ संध्याकाळ दुध घालण्यासाठी व बाजार करणे करीता ओढ्यावरील निसरड्या वाटेणे चालणे अवघड झाले आहे. सार्वजनीक बांधकाम विभागाने लोकाची होणारी गैरसोय व वाहनाची घरगुंडी अपघात टाळणे करीता, भरावा व खडीकर वेळेत पूर्ण करने तसेच पुलाची उंची वाढल्याने खांबावरील विध्युत तारा, वाहनाना लागून अपघात होण्याची शक्ता आहे. तरी दोन्ही बाजूचे खांब बदलून विध्युत तारा वाहनाना लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतीकामा करीता शेतकऱ्यांना डोक्यावर ओझे घेऊन पुलावरील चिखलातून शेताकडे जावे लागत आहे, तरी खडीकरण करून, ताबतोब रस्ता पुर्ण करावा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
