Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रभूमिअभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ.- आजरा कार्यालयाला वाली कोण?🛑कै. श्री. राजाराम गुरव विकास...

भूमिअभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ.- आजरा कार्यालयाला वाली कोण?🛑कै. श्री. राजाराम गुरव विकास सेवा संस्था, खानापूरच्या नूतन संचालक पदी अनिकेत चराटी, अजिंक्य गुरव यांची निवड.

भूमिअभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ.- आजरा कार्यालयाला वाली कोण?
🛑कै. श्री. राजाराम गुरव विकास सेवा संस्था, खानापूरच्या नूतन संचालक पदी अनिकेत चराटी, अजिंक्य गुरव यांची निवड.

आजरा – प्रतिनिधी.

आजरा भूमी अभिलेख कार्यलयाला जबाबदार अधिकारी नसल्याने नुसता सावळा गोंधळ सुरू आहे. छोट्या छोट्या कामासाठी लोकांना फेऱ्या माराव्या लागत आहे. कर्मचारी अधिकाऱ्यांकडे बोट दाखवतात तर अधिकारी नौट रीचेबल लागतात. फोन लागलाच तर प्रतिसाद देत नाहीत, अशी परिस्थिती आहे. अतिरिक्त कार्यभार असलेले सुधाकर पाटील फोन उचलत नाहीत. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष तयार झाला आहे.


आज दि. १३ रोजी श्रमिक मुक्ती दलाचे कॉ संपत देसाई, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नाबाबत भेटायला गेले असता कार्यालयात कोणाचा पायपोस कोणाला दिसत नव्हता. शेवटी अतिरिक्त कार्यभार असलेल्या सुधाकर पाटील यांना संपर्क करायचा प्रयत्न केला असता त्यांनीही कांहीच प्रतिसाद दिला नाही.जिल्हा भूमी अधिकारी भोसले यांना संपर्क केला असता आठदहा दिवसात आजरा कार्यालयाचा कारभार नीटपणे मार्गी लावू असे त्यानी सांगितले. येत्या आठ दिवसात याबाबत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

चौकट.

आजरा येथील भूमी अभिलेख कार्यलयाबाबत पालकमंत्री प्रकाश अबीटकर व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विशेष लक्ष घालणे आवश्यक आहे. अतिरिक्त कार्यभार असलेल्या सुधाकर पाटील यांनी किमान शुक्रवारी आजरा कार्यलयात हजर असणे आवश्यक आहे.

🛑कै. श्री. राजाराम गुरव विकास सेवा संस्था, खानापूरच्या नूतन संचालक पदी अनिकेत चराटी, अजिंक्य गुरव यांची निवड.

आजरा.- प्रतिनिधी.

कै. श्री. राजाराम गुरव विकास सेवा संस्था, खानापूरच्या नूतन संचालक पदी अनिकेत चराटी अण्णा व अजिंक्य गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
त्याबद्दल त्यांचे श्री. सोमेश्वर समूहाकडून सत्कार करण्यात आला
सदर निवड सुजय येझरे यांनी निवडणूक निरीक्षक अधिकारी आजरा व सेवा संस्थेचे सेक्रेटरी संतोष ढोणूक्षे यांनी काम पाहिले. सदर निवड आजरा तालुक्याचे नेते , आमचे आधारस्तंभ व आण्णा भाऊ समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली व सदर निवडणूक कार्यक्रमाला सेवा संस्थेचे चेअरमन, सर्व संचालक व समूहाचे सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

🛑आजरा नगरपंचायत क्षेत्रातील नगरपंचायत मार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुविधेतील त्रूटी बाबत.. आजरा अन्याय निवारण समितीचे निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायतीमार्फत पुरविणेत येत असलेल्या सुविधामध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्याची पुर्तता लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. याबाबत अन्याय निवारण समितीने आजरा नगरपंचायतला निवेदनाने विविध मागण्या केल्या आहेत.‌ यामध्ये
१) नाईक गल्ली मधील मशिदीमागे शेख वस्ती आहे. त्यांचेकडे आज एक महिना झाला पाणी आलेले नाही ते का आले नाही याची तपासणी करुन लवकरात लवकर पाणी पुरवठा चालु करावा.

२) साळगाव रोड येथील एकनाथ वंजारी यांचे घराजवळील १० ते १२ नळ कनेक्शनला १४ दिवसापेक्षा जास्त दिवस होऊन देखील पाणी आले नाही त्याची पहाणी करून जोपर्यंत पाणी येणार नाही तो पर्यंत त्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा.

३) इचलकरंजी बँक समोर ते काकतीकर पान दुकान पर्यंत जी १०,१२ नळ कनेक्शन देणेची आहेत. जवळ जवळ एक महिना झाला अद्याप काम चालु नाही.

४) क्रिडा संकुल मागील जे रस्त्याचे काम चालु आहे ते थांबवणे व ते नवीन पाईप लाईन कनेक्शन आराखड्यामध्ये समाविष्ठ करुन लवकरात लवकर पूर्ण करावे व त्यानंतर रस्ता चालु करणेस परवानगी द्यावी.

५) बऱ्याच ठिकाणी पाणी वाया जात असलेचे निदर्शनास आले आहे. उदा. चाफेगल्ली, नाईक गल्ली व इतर ठिकाणी त्याची पहाणी करुन पाण्याची आवश्यकता नसले तर एन्ड कॅप बसविणेत यावेत.

६) नवीन पाणीलाईन अधिकारी त्यांचे सुपरवाईझर तसेच नगरपंचायतीचे संबंधीत अधिकारी व अन्याय निवारण समिती यांची बैठक लावणे विषयी वेळ घेऊन समितीकडे निरोप द्यावा.

७) सिध्दीविनायक कॉलनी व समर्थ कॉलनी येथे नवीन रस्ते करणेचे कामे चालु आहे. त्याठिकाणी नवीन व जुनी नळ कनेक्शन पाईप वरच असलेने फार ठिकाणी गळती होत आहे. सदर ठिकाणची गळती काढूनच रस्त्याची कामे करणेस परवानगी द्यावी.

८) ज्या ज्या ठिकाणी १०० टक्के नळ कनेक्शनची कामे झाली आहेत व नवीन पाईपलाईनने पाणी पुरवठा सुरु आहे याची महिती आम्हाला ज्ञात करावी. असे दिलेल्या मागणीत म्हटले आहे. या निवेदनावर अध्यक्ष परशुराम बामणे, पांडुरंग सावतरकर गौरव देशपांडे जावेद पठान जोतिबा आजगेकर, विजय थोरवत सह पदाधिकारी सदस्य यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.