पत्रकारच असुरक्षित झाल्याने त्यांना न्यायमिळण्याबाबत. – उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज यांना निवेदन. ( जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वर गुन्हा दाखल करून कारवाई करावी.- अन्यथा निदर्शने.)
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.
पत्रकारच असुरक्षित झाल्याने त्यांना न्यायमिळण्याबाबत उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज यांना आजरा गडहिंग्लज चंदगड व भुदरगड येथील पत्रकार यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
माध्यमातील पत्रकार बांधव न्याय मागण्यासाठी निवेदन देत आहोत. चंदगड येथील पत्रकार विजय कांबळे यांनी गेल्या वर्षी ग्रामपंचायत केंचेवाडीशी सबंधित बातमी प्रसिद्ध केली होती. त्याचा राग मनात धरून तेथील रहिवाशी ऋषिकेश कुर्डे याने परवा फोन करून अश्लील शिवीगाळ करत घरात येऊन कापून टाकण्याची धमकी दिली.
त्यामुळे त्यांनी चंदगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली मात्र त्यांनी पत्रकार संरक्षण कायद्यातर्गत तक्रार न घेता अदखलपात्र गुन्हा दाखल केला. हे समजताच सबंधित व्यक्तीने पुन्हा मेसेज करून धमकी दिली आहे.

हे असे पत्रकारांवरील दहशतीचे प्रकार वाढत चालले असून संबंधितावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. अन्यथा जिल्हाभर उग्र आंदोलन करणे क्रमप्राप्त आहे. आपण आम्हा पत्रकार बांधवांना न्याय द्याल अशी विनंती आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष दीपक मांगले, गडहिंग्लज ता. अध्यक्ष नितीन मोरे, आजरा ता. अध्यक्ष संभाजी जाधव, गड उपाध्यक्ष अभिजीत मांगले, आजरा उपाध्यक्ष अमित गुरव, तसेच पदाधिकारी धनंजय शेटगे, अमित कांबळे, राजेंद्र यादव, निकिता पोवार सह पदाधिकारी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते
