वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे शिष्टमंडळाने घेतली खा. शरदचंद्र पवार यांची भेट.
आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद उर्फ उदयसिंह देसाई यांनी आज पुणे येथे खा. शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन आजरा साखर कारखान्याचे कार्यस्थळ असलेल्या गवसे व दर्डेवाडी ही गावे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येत असलेने कारखान्यास उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सदर गावे इको सेन्सिटिव्ह झोन मधून वगळणेत यावी यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली.
यावर खास. श्री पवार यांनी सविस्तर माहिती घेऊन केंद्रीय पर्यावरण मंत्री ना. भुपेंद्रसिंग यांची पुढील आठवड्यात दिल्ली येथे भेट घेऊन हा विषय मार्गी लावूयात त्यासाठी कारखान्याचे शिष्टमंडळास दिल्ली येथे येणेबाबत सुचना केल्या आहेत.
यावेळी आम. जयंत पाटील, कारखान्याचे संचालक उदयसिंह पोवार, अशोक तर्डेकर, दिगंबर देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, मुख्य शेती अधिकारी विक्रमसिंह देसाई इत्यादी उपस्थित होते.