गोकुळच्या दुधाला आजरा गड, चंदगडच्या दुधामुळे चव.- जनावरांचे आरोग्य व चारा व्यवस्थापन महत्त्वाचे.- गोकुळ संचालक चेतन नरके.
( आजरा शिवसेनेच्या वतीने दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा संपन्न. )
आजरा.- प्रतिनिधी.

दूध उत्पादक हे दूध संघाचे मालक आहेत परंतु कोणताही व्यवसाय करत असताना त्याचा ताळेबंद असला पाहिजेत, आपण दुग्ध व्यवसायातून किती मिळवले व किती खर्च आला. यामध्ये आर्थिक साक्षर व पारदर्शकता महत्त्वाची आहे. आजरा येथे शेतकरी व दुग्ध व्यवसाय मार्गदर्शक मेळावा शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने घेण्यात आला होता याप्रसंगीत गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंदे यांनी केले.
पुढे बोलताना श्री नरके म्हणाले.. आपण भौगोलिक परिस्थितीवर मात करून आपल्या जनावरांना योग्य ते खाद्य, चारा दिला पाहिजेत. दुग्ध व्यवसायात आजरा, गडहिंग्लज, चंदगड येथील दूध हे चवीला अत्यंत चांगला असल्यामुळे गोकुळ दूध संघ या विभागातील दुग्ध व्यवसायांचे कौतुकच करत असते. यांच्या दुधामुळे गोकुळच्या दुधाला चव आहे. जनावरांचे चारा व आरोग्य व्यवस्थापन, यासाठी पर्याय म्हणून मुक्त गोठ्यांचा, व बंदिस्त गोट्याचा दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यांच्याकडून विचार व्हावा. भविष्यात विचार करावा लागेल. गर्भधारणा साठी नवीन जातिवंत जनावरे तयार करावी लागतील. यासाठी गोकुळ कडून अनुदान दिले जाते. दुग्ध उत्पादक म्हणून काय करावे लागेल यासाठी शासनाचा हातभार घ्यावा. याबाबतचे ट्रेनिंग गोकुळच्या माध्यमातून मिळू शकते. दुग्ध व्यवसाय करताना लहान लहान गोष्टीकडे देखील शेतकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजेत जनावराच्या सेना वरून जनावरांचे आरोग्य ओळखले पाहिजेत यानुसार वैरण दिली पाहिजे.
जशी गट शेती असते. तसा गट पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय उत्तम व्यवसाय होऊ शकतो. यासाठी कुठेही मदत लागल्यास. गोकुळ दूध संघाकडे संपर्क करावा.
यावेळी शेतकरी , दुग्ध व्यवसाय धारक यांच्याकडून वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले त्याबाबतचे योग्य उत्तर गोकुळ दूध संघाचे संचालक, चेतन नरके व श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी दिली.
यावेळी गोकुळच्या संचालिका श्रीमंती रेडेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.

या मेळाव्याला उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, शिवसेना युवा सेनेचे आजरा गड, चंदगड मधील पदाधिकारी, आजरा तालुक्यातील विविध दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सेक्रेटरी, गोकुळ दूध संघाचे कर्मचारी वर्ग, तालुक्यातील दुग्ध व्यवसाय शेतकरी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विभाग प्रमुख दयानंद भोपळे यांनी केले. आभार तालुकाप्रमुख संजय येसादे यांनी मानले.