“ब” वर्ग – पाच हजार शेअर्स धारकांनी साखर उचल करावी. – ( कारखाना हितासाठी सर्व सभासदांनी उर्वरित शेअर्स रक्कम भरावी.- ‘ब’ वर्ग संचालक – अशोक तरर्डेकर.)
आजरा.- प्रतिनिधी.
वसंतराव देसाई सहकारी साखर कारखान्याने “ब” वर्गातील पाच हजार शेअर्स पूर्ण असलेल्या सभासदांनी साखर उचल करावी. याबाबत ‘ब’ वर्ग संचालक अशोक तरर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी श्री तरर्डेकर बोलताना म्हणाले एप्रिल २०२४ मध्ये कारखाना वार्षिक सभेमध्ये उत्पादित झालेल्या साखर घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु कारखान्याची स्थिती डळमळीत असताना सुद्धा कारखाना गाळप वाढवण्यास प्रयत्न सुरू होते. पण उशिरा का असेना चेअरमन व्हा. चेअरमन व संचालक मंडळाने निर्णय घेऊन साखर देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. परंतु “ब’ वर्ग मधून मी संचालक झालो असल्यामुळे माझी देखील तितकीच जबाबदारी होती. की ‘ब’ वर्ग मधील पाच हजार रुपये पूर्ण असलेल्या सभासदांना साखर द्यावी. त्यामुळे सर्व संचालक मंडळाने मांडलेल्या विषयाला संमती दिली व ‘ब’ वर्ग सभासदांना साखर देण्याचा निर्णय झाला.
त्यामध्ये पाच हजार पेक्षा कमी शेअर्स असलेल्या सभासदांनी आपली उर्वरित रक्कम कारखान्याच्या हितासाठी भरून शेअर्स रक्कम पूर्ण करावी. व साखरेचा लाभ घ्यावा. आजरा साखर कारखान्यामार्फत भाग भांडवल रू.१५०००/- व रू. १००००/- जमा असलेल्या सभासदांना साखर वाटप सुरू आहे. त्यामध्ये दि.३/६/२०२५ इ. रोजी झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये कारखान्याकडे शेअर्स पोटी रु.५०००/- ते रू. १००००/- पर्यंत रक्कम जमा असलेल्या मंजुर सभासदांनाही प्रत्येकी १० किलो साखर प्रति किलो रू.२५/- या सवलतीच्या दरात देणेचा निर्णय घेणेत आला आहे.
सदर साखर व यापुर्वी सुरू असलेली रु.१००००/- व रु.१५०००/- ची २५ किलो व ५० किलो साखर उचलणेची मुदत दि.१०/६/२०२५ पासुन दि.३०/६/२०२५ अखेर ठेवणेत आलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचा पुर्ण सभासद रू.१५०००/- चा असलेने ज्या सभासदांना शेअर्स रक्कम रु.१००००/- किंवा रू.१५०००/- पुर्ण करावयाची आहे. त्यांनी अपुरी रक्कम दि.३०/६/२०२५ पुर्वी जमा केलेस त्यांनाही शेअर्स रक्कमेच्या प्रमाणात २५ किलो व ५० किलो साखर उचल दिली जाईल. कारखान्याच्या रु.५०००/- व त्यावरील शेअर्स रक्कम भरलेल्या मंजुर सभासदांनी कारखान्याचे संबंधीत शेती सेंटर ऑफीस मधुन साखर कार्ड घेवून आपल्या तालुका संघाच्या शाखेमधुन मुदतीत साखर उचल करावी असे आवाहन केले.
तसेच यामध्ये कोणती अडचण आल्यास ९८९७६६११०० या क्रमांकावर संपर्क करावा. व ५००० सभासद रक्कम पूर्ण असलेल्या ‘ब’ वर्गातील सभासदांना साखर देण्याचा निर्णय दिला. याबद्दल चेअरमन, व्हा चेअरमन, संचालक मंडळाचे संचालक श्री तरर्डेकर यांनी आभार मानले.