Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रपत संस्था फेडरेशन च्या चेअरमन पदी राजाराम पोतनीस.व्हा, चेअरम पदी राजश्री खोराटे.🛑आजऱ्यात...

पत संस्था फेडरेशन च्या चेअरमन पदी राजाराम पोतनीस.व्हा, चेअरम पदी राजश्री खोराटे.🛑आजऱ्यात बकरी ईद उत्साहात साजरी.

🛑पत संस्था फेडरेशन च्या चेअरमन पदी राजाराम पोतनीस.
व्हा, चेअरम पदी राजश्री खोराटे.
🛑आजऱ्यात बकरी ईद उत्साहात साजरी.

💥आजऱ्यात बकरी ईद उत्साहात साजरी.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहरासह परिसरात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली.नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या. आजरा शहरात सकाळी साडे आठ वाजता ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आले. यावेळी प्रवचन
मुफ्ती खालिद खलीफ, नमाज पठण मौलाना लियाकत तगारे तर खुतबा पठण हाफिज इरफान लाडजी यांनी केले. ईदच्या निमित्ताने दिवसभर उत्साही वातावरण होते.हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
ईदच्या पार्श्वभूमीवर आजऱ्याचे सहा.पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी भेट दिली. उत्तूर येथेही बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली
.

🛑पत संस्था फेडरेशन च्या चेअरमन पदी राजाराम पोतनीस.
व्हा, चेअरम पदी राजश्री खोराटे.

आजरा.- प्रतिनिधी‌

आजरा तालुका सह, पत संस्था फेडरेशन लि, आजरा या संस्थेची निवडणूक बिन विरोधी होऊन पदाधिकारी निवड झाली. या मध्ये चेअरमन पदी बाजार समिति चे माजी सभापती राजाराम पोतनीस व व्हा, चेअरम पदी राजश्री खोराटे यांच्या निवड बिन विरोधी पार पडल्या, चेअरम पदासाठी मावळते चेअरमन आनंदा कुंभार यानी नाव सुचवले त्यास सुनिल पाटील यानी अनुमोदन दिले. व्हा, चेअरम पदासाठी चेअरमन अल्बर्ट डिसोजा यानी सुचवले त्यास सिताराम तांबेकर यानी अनुमोदन दिले,

यावेळी आजरा साखर कारखाना श्री. डिसोजा यांनी संस्थेच्या स्थापने पासूनचा आढावा घेऊन नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा दील्या,संस्थेचे मावळते चेअरमन श्री. कुंभार यानी फेडरेशन समोरील अडचणी व त्यावरील उपाय सुसवले व विद्यमान चेअरमन श्री.पोतनीस नक्की मात करतील अशी अशा व्यक्त केली, सदर बैठकीत माजी वसूली अधिकारी निवॢती कोलते यांचा व निवडणूक अधिकारी जे, एन बंडगर यांचा सत्कार करण्यात आला, संस्थेचे संचालक श्री. डिसोजा श्री. कुंभार सुनिल पाटील सिताराम तांबेकर भिवा जाधव पांडुरंग ढवळे रमेश कांबळे , उपस्थित होते, आभार संस्थेचे सचिव दीनकर शिंदे यानी मानले,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.