🛑गिजवणेतील श्री. लक्ष्मी सहकारी दूध संस्थेच्या. भ्रष्टाचारासंदर्भात संघर्ष मोर्चाने प्रांताधिकारी, मुख्याधिकारी यांना निवेदन.
🛑शिवराज्यभिषेक दीना निमित्त आजऱ्यात वृक्षारोपण.
🛑गिजवणेतील श्री. लक्ष्मी सहकारी दूध संस्थेच्या. भ्रष्टाचारासंदर्भात संघर्ष मोर्चाने प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी

अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक संघर्ष समिती यांच्या वतीने मौजे गिजवणे येथील श्री. लक्ष्मी सहकारी दूध व्याय. संस्था मर्या.गिजवणे या संस्थेच्या भ्रष्टाचारासंदर्भातील विविध मागण्यांसाठी तसेच पथविक्रेते संघर्ष समिती व मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने पथविक्रेते कायद्याचे उल्लंघन प्रशासनाने व शासनाने केले आहे. वतविक्रेत्यांवर झालेल्या अन्याया बाबतीत व त्या संदर्भात आमची कायदेशीर बाजू मांडणारे निवेदन संघर्ष मोर्चा काढून प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन आले.
हा संघर्ष मोर्चा तहसील कार्यालय ते प्रांत कार्यालय असा निघाला होता. या मोर्चाचे नेतृत्व संग्राम सावंत, अँड. दशरथ दळवी, प्रा.अनिल उंद्रे व प्रमोद पाटील यांनी केले. यावेळी जोरदार घोषणा व प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये संग्राम सावंत, अँड. दशरथ दळवी, बाबासाहेब पाटील विनोद पाटील, गायत्री रणदिवे यांची भाषणे झाली. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांच्याबरोबर अखिल भारतीय किसान सभा दूध उत्पादक संघर्ष समिती पत्याविक्रेते संघर्ष समिती व मुक्ती संघर्ष समिती यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर तसेच शिष्टमंडळाबरोबर बैठक झाली.
यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी गिजवणे, गडहिंग्लज येथील श्री लक्ष्मी दूध व्यवसायिक संस्थेत ज्या भ्रष्टाचाराबाबतीत आपले म्हणणे मांडण्यासाठी, संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी पत्रव्यवहार करून अशी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे व मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पथविक्रेते यांच्यावर झालेल्या अन्यायाची बाजू संघटनेच्या वतीने मांडण्यात आली जोपर्यंत होकर्स झोन होत नाही. तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही यासाठी पथविक्रेतांवर अन्याय होईल आणि त्यांचा रोजगार थांबेल अशी गोष्ट होता कामा नयेत. यासाठी आपण लक्ष घातले पाहिजे. जर पथविक्रेतांना विक्रीस बंदी आणली तर त्यांना रोजगार भत्ता दिला पाहिजे. अशी ही मागणी यावेळी संघटनेने केली. या चर्चेत संग्राम सावंत, अँड. दशरथ दळवी, प्रमोद पाटील,प्रा.अनिल उंद्रे,गायत्री रणदिवे,मंगल पाटील,अमर रणदिवे, जनार्दन तोडकर,सागर शिंदे,संभाजी मोहिते, मानतेस बन्ने, कृष्णा कांबळे, विजय कडूकर, गणेश कळेकर, स्वप्निल कोरी यांनी चर्चेत भाग घेतला.
🛑शिवराज्यभिषेक दीना निमित्त आजऱ्यात वृक्षारोपण.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुका मराठा महासंघ आजरा यांचे वतीने आज दिनांक ६ जून शिवराज्यभिषेक दीन साजरा करण्यात आला. यावेळी छ.शिवाजी महाराजांच्या मुर्तींचे उपाध्यक्ष शंकरराव शिंदे व कार्याध्यक्ष संभाजीराव इंजल यांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर कार्यकारिणी सदस्य भाऊ निर्मळ सर यांच्या मौजे परेवाडी येथील शेतात वेगवेगळ्या प्रकारची झाडांचे रोपण केले या मध्ये अंबा, फणस, काजू, मसाले, करंजी, जांबुळ इ.चे रोपण केले. आजरा तालुका मराठा महासंघ गेली १९ वर्षे हे वृक्षारोपणाचा काम सातत्यपूर्ण करत आले आहे. व हे वृक्षारोपण शेतकऱ्याच्या शेतात केले असल्यामुळे ती वृक्ष जगली आहेत. व त्या फळांचा आस्वाद ते शेतकरी घेत आहेत. याचा आनंद मराठा महासंघ घेत आहे. आजच्या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, उपाध्यक्ष सी. आर. देसाई,तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण,उपाध्यक्ष शंकरराव शिंदे, सरचिटणीस प्रकाश देसाई,खजिनदार, सूर्यकांत अजगेकर, कार्यकारिणी सदस्य भाऊ निरमाळे,निर्मल सर, आजी माजी सैनिक वेल्फेअर फौडेशन चे अध्यक्ष, दत्तात्रय मोहिते, शिवाजीराव इंजळ, चंद्रकांत परपोलकर, विष्णू सुपल,आनंदा गावडे ,महादेव पोवार, शिवाजीराव गुदुळकार, गणपतराव डोंगरे इ. कार्यकर्ते उपस्थित होते सी. आर. देसाई सर यांचे मार्फत स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न झाला .
