Homeकोंकण - ठाणेस्मार्ट मीटर ग्राहकावर लादु नये अन्यथा आंदोलन हाती घेऊ. - आजरा महावितरणला.-...

स्मार्ट मीटर ग्राहकावर लादु नये अन्यथा आंदोलन हाती घेऊ. – आजरा महावितरणला.- सरपंच संघटनेचा इशारा.

स्मार्ट मीटर ग्राहकावर लादु नये अन्यथा आंदोलन हाती घेऊ. – आजरा महावितरणला.- सरपंच संघटनेचा इशारा.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील ग्रामीण भागत गावोगावी घरगुती विज मीटर वापरण्याबाबत स्मार्ट मीटर प्रतिबंध करणेबाबत आजरा ता. सरपंच संघटना यांनी ता. अध्यक्ष बापू निऊगरे व महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुषमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजरा महावितरण अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. विज वितरण कंपनीमार्फत ग्रामीण भागात प्रत्येक घरगुती विज मोटर बदलून स्मार्ट मीटर कोणतीही मागणी नसताना बसवणे चालु केले आहे. मात्र ग्रामीण भागातून या मोटरबाबत तक्रारी आहेत. शिवाय ग्रामीण घरगुती विज बिले या मीटरमुळे वाढून येत आहेत. काही ठिकाणी तर विज बिल दुप्पट तिप्पट आकराने येत आहेत.

ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजूर यांना हि बिले परवडण्या योग्य नाहीत शिवाय ग्रामीण भागात विजेचा वापर कमी असतो त्यामुळे येथील आकार कमी असायला हवा मात्र या स्मार्ट मोटर वापराने विज ग्राहकामध्ये प्रचंड नाराजी आहे. एकीकडे शासन १०० युनिट विज मोफत देणार अशी घोषणा करीत असताना स्मार्ट मोटर बसवून ग्राहकांची फसवणूक होत आहे. तेव्हा ग्रामीण भागात घरोघरी लावलेली स्मार्ट मीटर काढून त्या ठिकाणी पूर्ववत विज मीटर बसविणेत यावीत, याची कार्यवाही न झालेस विज बिलांची थकबाकी वाढणार आहे.‌ तेव्हा स्मार्ट मीटर काढावीत अन्यथा तालुक्यातील जनता या मीटर विरोधात आंदोलन हाती घेईल याची नोंद घ्यावी. असे आजरा तालुका सरपंच संघटना यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर ता. अध्यक्ष बापू निऊंगरे महिला आघाडी अध्यक्षा सुषमा पाटील, सरपंच जयश्री गिलबिले, स्वाती कोंडुसकर, सरिता पाटील, सविता जाधव, नारायण देसाई, समीर देसाई, तसेच मारुती मोरे, संभाजी सरदेसाई, सुनिता कांबळे सह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व सरपंच संघटनेचे पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.