गिजवणे श्री.लक्ष्मी दूध संस्थेच्या भ्रष्टाचारासंदर्भातील विविध मागण्यांसाठी ६ जून रोजी प्रांत कार्यालयावर ( अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष मोर्चा – संग्राम सावंत.)
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.
मौजे गिजवणे येथील श्री.लक्ष्मी सहकारी दूध व्याय.संस्था मर्या.गिजवणे या संस्थेच्या भ्रष्टाचारासंदर्भातील विविध मागण्यांसाठी शुक्रवार दि.६ जून रोजी तहसिलदार कार्यालय गडहिंग्लज ते प्रांत कार्यालय (उपविभागीय कार्यालय) येथे “संघर्ष मोर्चा” काढून आंदोलन प्रांत कार्यालय गडहिंग्लज यांच्यासमोर करणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज यांनी लक्ष घालावे. यासाठी त्यांच्या कार्यालयावर हा मोर्चा घेऊन जाणार आहोत.
हा मोर्चा अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने मौजे गिजवणे येथील श्री.लक्ष्मी सहकारी दूध व्याय. संस्था मर्या.गिजवणे या संस्थेच्या भ्रष्टाचारासंदर्भातील विविध मागण्यांसाठी लोकांनी व संघटनेने संबंधित श्री. लक्ष्मी सहकारी दूध व्याय.संस्था मर्या. गिजवणे यांना निवेदन व अर्ज दिलेले आहेत. याकडे संस्थेने दुर्लक्ष केलेले आहे.माहिती दिलेली नाही. त्यामुळेच या संस्थेच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी शुक्रवार दि. ६ जून रोजी तहसिलदार कार्यालय गडहिंग्लज ते प्रांत कार्यालय (उपविभागीय कार्यालय) येथे “संघर्ष मोर्चा” काढून आंदोलन प्रांत कार्यालय गडहिंग्लज यांच्यासमोर होणार आहे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर अखिल भारतीय किसान सभा दूध उत्पादक संघर्ष समिती संग्राम सावंत मुख्य संघटक सागर शिंदे, गणेश कळेकर, मानतेस बन्ने, जनार्दन तोडकर, स्वप्निल कोरी, विजय कडूकर यांच्यासह दूध उत्पादकांच्या सह्या आहेत.