Homeकोंकण - ठाणेसरोळी येथे वासरू संगोपन स्पर्धा उत्साहात साजरी.

सरोळी येथे वासरू संगोपन स्पर्धा उत्साहात साजरी.

सरोळी येथे वासरू संगोपन स्पर्धा उत्साहात साजरी.

आजरा.- प्रतिनिधी.

सरोळी ता.आजरा येथे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांचे मार्फत जागतिक दूध दिनानिमित्त वासरू संगोपन स्पर्धा चे आयोजन करण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये सरोळी येथील भावेश्वरी दूध संस्था , धनलक्ष्मी दूध संस्था, मंगाई देवी दूध संस्था, श्रीकृष्ण दूध संस्था या संस्थेच्या दूध उत्पादक ६० सभासदांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५ सभासदांनी भाग घेतला होता. यामध्ये ० ते ६ महिने गटात आणि ६ ते १२ महिने गटात स्पर्धा झाल्या. प्रथम द्वितीय आणि तृतीय विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ३०००, २०००,१००० व पारितोषक देण्यात आली.

यावेळी गोकुळ संघाचे असिस्टंट मॅनेजर डॉ. अविनाश जोशी यांनी वासरू संगोपणाविषयी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. स्पर्धेचे परीक्षण डॉ.अक्षय अवताडे ( पशुवैद्यकीय अधिकारी महाराष्ट्र शासन) व डॉ.पी एम जालकर (पशुवैद्यकीय अधिकारी गोकुळ ) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या टीम मध्ये डॉ.प्रवीण खटावकर डॉ. अनिल पाटील डॉ. विजय पाटील डॉ. आनंदा पाटील महेश कोल्हे ,( दूध संकलन अधिकारी )दयानंद जाधव (सुपरवायझर) यांचा सहभाग होता. बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये दूध उत्पादक रामदास पाटील, रेखा पांडुरंग पाटील, शिवाजी देसाई, यशवंत पाटील, तानाजी पाटील, जयवंत पाटील, बाबासो पाटील, पुंडलिक पाटील, प्रभावती पाटील, सुदाम पाटील हे विजेते ठरले. विजेत्याना आजरा कारखाना संचालक एम के देसाई, गणपती पाटील, सागर पाटील, रमेश देसाई यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी गावातील सर्व दूध संस्थांचे सचिव, पदाधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.