Homeकोंकण - ठाणेकोल्हापुरात.- कोरोनाबाधित महिलेचा बळी. ( पीपीई किट नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा...

कोल्हापुरात.- कोरोनाबाधित महिलेचा बळी. ( पीपीई किट नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा नकार.)🟥श्रेयस अय्यरच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर विजय साकारत फायनलमध्ये मारली धडक🟥22 नव्या जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा.- दोन ठिकाणी महिलांच्या हाती धुरा.

🛑कोल्हापुरात.- कोरोनाबाधित महिलेचा बळी. ( पीपीई किट नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा नकार.)
🟥श्रेयस अय्यरच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर विजय साकारत फायनलमध्ये मारली धडक
🟥22 नव्या जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा.- दोन ठिकाणी महिलांच्या हाती धुरा.

🛑कोल्हापुरात.- कोरोनाबाधित महिलेचा बळी. ( पीपीई किट नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा नकार.)

कोल्हापूर :- प्रतिनिधी

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कोल्हापूरमध्येही कोरोना बाधित महिलेचा बळी गेला आहे. 75 वर्षीय महिलेवर गेल्या चार दिवसांपासून सीपीआय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.मात्र,रविवारी 1 जून रोजी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला पाचगावात असून ती कोरोना बाधित होती. दरम्यान महिलेच्या मृत्यूनंतर पालिका कर्मचाऱ्यांनी पीपी किट नसल्याने संबंधित महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला.
दुसरीकडे, देशात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3783 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या वेबसाइटनुसार, 22 मे रोजी भारतात 157 रुग्ण होते. 9 दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये 1372 टक्के वाढ झाली आहे. केरळमध्ये सर्वाधिक 1400 रुग्ण आहेत. त्याच वेळी, महाराष्ट्रात 485 आणि दिल्लीत 436 सक्रिय रुग्ण आहेत. जानेवारीपासून कोरोनामुळे 29 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी गेल्या दोन दिवसांत २2 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी, बेंगळुरूमध्ये एका 63 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. त्याला दोन्ही लसींसह बूस्टर डोस देखील देण्यात आला होता. त्याच वेळी, दिल्लीत एका 60 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. महाराष्ट्र-केरळमध्ये सर्वाधिक 8-7 जणांचा मृत्यू झाला आहे.

🟥महाराष्ट्रात 9 हजारांहून अधिक कोविड चाचण्या

महाराष्ट्र सरकारने सांगितले की शनिवारी कोविडचे 68 नवीन रुग्ण आढळले. तर जानेवारी 2025 पासून मुंबईत एकूण 749 रुग्ण आढळले आहेत. जानेवारीपासून राज्यात 9592 कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

🟥श्रेयस अय्यरच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर विजय साकारत फायनलमध्ये मारली धडक

अहमदाबाद :- वृत्तसंस्था

मुंबई इंडियन्सचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे. श्रेयस अय्यरच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर विजय साकारला आणि फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आता फायनलमध्ये पंजाबचा सामना आरसीबीशी होणार आहे. मुंबई इंडियन्सने धमाकेदार खेळ करत या सामन्यात २०३ धावांचा डोंगर उभारला होता. पंजाबचा संघ विजयासाठी २०४ धावांचा पाठलाग करण्यासाठी आला पण त्यांना सुरुवातीला काही धक्के बसले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि नेहाल वधेरा यांनी पंजाबला सावरले. नेहाल बाद झाला परंतु मुंबईच्या विजयाच्या मार्गात श्रेयसचा अडसर होता. श्रेयसने यावेळी नाबाद ८७ धावांची खेळी साकारली आणि संघाला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाची सुरुवात पण खराब झाली आणि त्यांनी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ प्रभसिमरन सिंगची विकेट स्वस्तात गमावली.

🟥प्रभसिमरनला 6 धावा काढल्यानंतर ट्रेंट बोल्टने आऊट केले. त्यानंतर, जोश इंग्लिस आणि प्रियांश यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी झाली. 20 धावांवर प्रियांशची अश्विनी कुमारने शिकार केली बळी ठरला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने पंजाब किंग्जला तिसरा धक्का दिला, जेव्हा त्याने जोश इंग्लिसला आऊट केले. इंग्लिसने 21 चेंडूत 5 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. पण त्यानंतर श्रेयस आणि वधेरा यांनी मुंबई इंडियन्सच्या नाकी नऊ आणले होते. पण अश्विनी कुमारने वधेराला ४८ धावांवर बाद केले आणि मुंबईला विजयाची आशा दिसायला लागली. पण श्रेयस अय्यरने दमदार फलंदाजी करत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

🟥22 नव्या जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा.- दोन ठिकाणी महिलांच्या हाती धुरा
( भाजपाने दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यपदासाठी शलाका साळवी आणि वसई-विरार जिल्हाध्यक्षपदासाठी प्रज्ञा पाटील यांची केली निवड)

मुंबई :- प्रतिनिधी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपाने सुद्धा लोकसभा निवडणुका पार पडल्यापासनूच संघटनात्मक निवडणुकीवर भर दिला आहे.यासाठी भाजापाकडून बूथ कमिटी, मंडलअध्यक्ष, शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष अशा निवडी आतापर्यंत पार पडल्या आहेत. यानंतर आता भाजपाच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची जून महिन्यातच घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी भाजपाने राज्यातील रिक्त राहिलेल्या जिल्हाध्यक्षपदांवर अखेर 31 मे ला घोषणा केली आहे.

पक्ष संघटनात्मक पातळीवर अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने भाजपाने आज 22 नव्या नेत्यांकडे जिल्हास्तरावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. यात शहरी आणि ग्रामीण भागांचा समावेश असून भाजपाने दोन ठिकाणी महिलांच्या हाती धुरा सोपवली आहे. भाजपाने दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यपदासाठी शलाका साळवी आणि वसई-विरार जिल्हाध्यक्षपदासाठी प्रज्ञा पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

♦️उत्तर महाराष्ट्र
अहिल्यानगर शहर – अनिल मोहिते
नाशिक शहर – सुनील केदार
नाशिक दक्षिण – सुनील बच्छाव
नाशिक उत्तर – यतीन कदम

♦️ पश्चिम महाराष्ट्र
पुणे दक्षिण – शेखर वडणे
कोल्हापूर शहर – विजय जाधव

♦️विदर्भ
गडचिरोली – रमेश बारसागडे
चंद्रपूर शहर – सुभाष कासमगुट्टवार
चंद्रपूर ग्रामीण – हरिश शर्मा
वर्धा – संजय गाते

♦️मराठवाडा
परभणी ग्रामीण (शहराध्यक्ष) – सुरेश भुबंरे
छत्रपती संभाजीनगर शहर – किशोर शितोळे
तालुर शहर – अजित पाटील कव्हेकर
लातूर ग्रामीण – बसवराज पाटील
नांदेड उत्तर – किशोर देशमुख
नांदेड दक्षिण – संतुकराव हंबर्डे
बीड – शंकर देशमुख

♦️मुंबई
उत्तर पश्चिम मुंबई – ज्ञानमूर्ती शर्मा
दक्षिण मध्य मुंबई – निरंजन उभारे
दक्षिण मुंबई – शलाका साळवी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.