लालपरीचे ७७ वर्षात पदार्पण.-
तरीही बिकट अवस्था.. आजऱ्यात दिले विविध मागणीचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी
गेली ७७ वर्ष लोकांच्या सेवेत असणारी लाल परी आजतागायत सेवा पुरवत आहे. जणू लोकांच्या सोबत तिची नाळ जुळली गेली आहे. परंतु सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे बिकट अवस्थेत असणारी लाल परी आजही लोकांच्या मनात स्थान करून टिकून आहे. सरकारने जरी तिच्याकडे दुर्लक्ष केले असले तरी सामान्य जनता व सर्व कर्मचारी यांनी तिचे अस्तित्व अजून टिकवून ठेवले आहे.
अशी ही आमची हवीहवीशी लाल परीने ७७ व्या वर्षात पदार्पण केले तिचा असाच प्रवास पुढील वर्षात सुरळीत चालावा व लोकांना तिचा पूर्णपणे लाभ मिळावा याकरता सरकारकडे काही मागण्याची पूर्तता करण्यासाठी निवेदन देण्यात आले. व एसटी बळकट करण्याची अपेक्षा आज सर्व संघटनांच्या वतीने सरकारकडे मागणी करण्यात आली या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या वर्धापन दिनाच्या मंगल शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित कॉ. पद्मिनी पिळणकर, जुल्फी कारशेख, गोपाळ होन्याळकर, दशरथ सोनुले, इर्शाद भडगावकर, प्रसाद पिळणकर, अमित सुळेकर, कांचन सावंत, जितेंद्र नवार, यांच्या वतीने देण्यात आल्या त्यावेळी एसटी महामंडळ कर्मचारी व चालक वाहक उपस्थित होते .
