Homeकोंकण - ठाणेमान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल.- पुढच्या दोन ते तीन दिवसात कोकणात धडकणार.- हवामान...

मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल.- पुढच्या दोन ते तीन दिवसात कोकणात धडकणार.- हवामान विभागाची माहिती.🟥एका व्यक्तीचा सर्पदंशाने ३० वेळा मृत्यू.- लाटले २३ कोटी.- भाजपाशासित राज्यात घोटाळा उघडकीस.

🟥मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल.- पुढच्या दोन ते तीन दिवसात कोकणात धडकणार.- हवामान विभागाची माहिती.
🟥एका व्यक्तीचा सर्पदंशाने ३० वेळा मृत्यू.- लाटले २३ कोटी.- भाजपाशासित राज्यात घोटाळा उघडकीस.

🟥मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल.- पुढच्या दोन ते तीन दिवसात कोकणात धडकणार.- हवामान विभागाची माहिती.

मुंबई :- प्रतिनिधी.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. अशातच आता सर्वांसाठी एक दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. आठ दिवस आधीच मान्सूनने केरळमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, पुढच्या दोन दिवसातच मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.

मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. यापूर्वी 2009 मध्ये मान्सून केरळात 23 मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर 15 वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे. आता पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. तर मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो.

केरळनंतर पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनचा प्रवेश दक्षिण आणि मध्य भारतात होणार आहे. दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे.येत्या 36 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असून मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात शेती पिकांना यापावसाचा फटका देखील बसला आहे.

🟥एका व्यक्तीचा सर्पदंशाने ३० वेळा मृत्यू.- लाटले २३ कोटी.- भाजपाशासित राज्यात घोटाळा उघडकीस

भोपाळ :- वृत्तसंस्था

मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्याच्या केवळारी तहसीलमध्ये, नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याच्या बनावट घटनांच्या आधारे तब्बल ११.२६ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. ‘द जंगल बुक’मधील प्रसिद्ध साप ‘का’चा संदर्भ देत या भागाची ओळख दिली जाते आणि तिथेच साप चावल्याच्या ३० बनावट मृत्यू दाखवून पैसे वळवण्यात आले.अशाप्रकारे राज्यात २३ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे.

सिवनी जिल्ह्यातील केवलारी तहसीलच्या बिलांच्या छाननीतून हा घोटाळा उघडकीस आला. वित्त विभागाने याची सविस्तर चौकशी सुरू केली आहे. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सहायक ग्रेड-३ चा कर्मचारी सचिन दहायक हा असून त्याने ११.२६ कोटी रुपये ४७ लोकांच्या बँक खात्यात जमा केल्याचे तपासात उघडकीस आले. यात त्याच्या ४६ नातेवाईक, मित्रमंडळींचा आणि एका सरकारी कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

🛑२०१८-१९ ते २०२१-२२ दरम्यान झालेल्या या घोटाळ्यात सरकारी नोंदींमध्ये सर्पदंश, बुडून आणि वीज पडून मृत्यू झालेले अनेक जण आढळले. विशेषतः सर्पदंशामुळे अनेक ‘मृत्यू’ झाले.

🟥प्रशासनाचे म्हणणे काय?

सिवनीच्या जिल्हाधिकारी संस्कृती जैन यांनी सांगितले की, सर्व संबंधितांवर शिस्तभंग प्रक्रिया सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

💥बनावट आदेशांद्वारे रक्कम दिली

केवलारी तहसीलच्या नोंदींमध्ये रमेश नावाच्या व्यक्तीचा ३० वेळा सर्पदंशाने ‘मृत्यू’, तर द्वारिकाबाई २९ वेळा ‘मृत्यू’ झाल्याचे दाखवण्यात आले होते. तर राम कुमार याचा २८ वेळा मृत्यू दाखवून, शासनाच्या नैसर्गिक आपत्ती साहाय्य योजनेअंतर्गत ४ लाखांची भरपाई घेतली गेली. संपूर्ण व्यवहारात कोणतीही मृत्यू प्रमाणपत्रे, पोस्टमॉर्टम अहवाल, पोलिस पडताळणी नव्हती. चौकशीत आणखी ४ तहसीलदार, एक एसडीएम आणि एक अतिरिक्त सहाय्यक कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.