Homeकोंकण - ठाणेगिरणी कामगारांनी मोर्चा क्रांती चौकात हुतात्म्यांना अभिवादन करून मोर्चा स्थगित.‌- पालकमंत्र्यांनी भेट...

गिरणी कामगारांनी मोर्चा क्रांती चौकात हुतात्म्यांना अभिवादन करून मोर्चा स्थगित.‌- पालकमंत्र्यांनी भेट नाकारली.

गिरणी कामगारांनी मोर्चा क्रांती चौकात हुतात्म्यांना अभिवादन करून मोर्चा स्थगित.‌- पालकमंत्र्यांनी भेट नाकारली.

गारगोटी.- प्रतिनिधी.

गिरणी कामगारांच्या मोर्चाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट नाकारली पोलीस प्रशासनाने मोर्चा अडविला अखेर गिरणी कामगारांनी मोर्चाने क्रांती चौकात हुतात्म्यांना अभिवादन करून मोर्चा स्थगित केला.

आज दि. २५ रोजी हजारोंच्या संख्येने गिरणी कामगार वारसदार गारगोटी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहुन. १५ मार्च २०२४ रोजीचा जी आर रद्द करा व गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर देऊन पुनर्वसन करा या मागणीसाठी हजारो गिरणी कामगार वारसदार गारगोटी येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्याकरिता जमले असता पालकमंत्र्यांना भेट नाकारली असता आक्रमक भूमिका घेत कामगार कामगारांनी गारगोटी एस टी स्टॅंण्ड मध्ये ठिय्या आंदोलन केले.

अखेर प्रचंड पाऊस आणि लांबुन आलेले गिरणी कामगार यांच्याशी बोलून कॉम्रेड अतुल दिघे यांनी या पुढे आक्रमक आंदोलन केले जाईल असा इशारा देऊन हा मोर्चा स्थगित केला.
या मोर्चाला मार्गदर्शन करताना कॉम्रेड अतुल दिघे कॉम्रेड धोंडीबा कुंभार कॉम्रेड शांताराम पाटील गोपाळ गावडे शिवाजी सावंत नारायण भडांगे कृष्णा चौगुले अमृता कोकीतकर पद्मिनी पिळणकर तुकाराम तळप यांनी मार्गदर्शन केले व पुढील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले या मोर्चाला गिरणी कामगार, वारसदार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.