Homeकोंकण - ठाणेकोरोनाचा पहिला बळी.२१ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू;- चिंता वाढली.- रुग्णांची संख्या 10...

कोरोनाचा पहिला बळी.२१ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू;- चिंता वाढली.- रुग्णांची संख्या 10 वर

🟥 कोरोनाचा पहिला बळी.
२१ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू;- चिंता वाढली.- रुग्णांची संख्या 10 वर

ठाणे :- प्रतिनिधी

ठाण्यातील कळवा रुग्णालयात उपचार घेणार्‍या २१ वर्षीय तरूणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंब्रा येथे राहणाऱ्या युवकाला शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २०२५ वर्षातील कोरोनाचा हा पहिला बळी असल्याचं बोललं जात आहे. ठाण्यातील कळवा रुग्णालयात सध्या दोघांवर उपचार सुरु आहेत. ठाण्यात रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात 21 वर्षीय तरुण कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. ठाण्यातील कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 21 वर्षीय तरुणावर गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार चालू होते. मात्र उपचारादरम्यान त्याने याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हा तरुण मुंब्रा येथील रहिवासी आहे. सकळी 6 वाजेच्या सुमारास त्यााच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याला 22 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असताना त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

या चाचणीचा अहवाल काल समोर आला होता. त्याची ही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याचा आज सकाळी 6 वाजता उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या कोरोना झपाट्याने वाढत आहे. 23 मे रोजी राज्यात 45 नवे कोरोनाग्रस्त आढळले. एकट्या मुंबईत सापडलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ही 35 आहे. सध्या मुंबईतीली कोरोनाग्रस्तांची संख्या ही 185 पर्यंत पोहोचली आहे. आज याच रुग्णसंख्येत काही भर पडण्याची शक्यता आहे. मे महिन्यापासून मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.