🟥भारताने पाकिस्तानच्या उडवल्या चिंधड्या.- भारताने अनेक दहशतवाद्यांना नरकात धाडले.- पाकिस्तानचं जेएफ 17 लढाऊ विमान पाडले
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था
भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं आज (6 मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री 1:28 वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन 1:51 वाजता ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.
भारतील सैन्याने बुधवारी 7 मे रोजी रात्री उशीरा पाकिस्तानाताली दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला चढवला. या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये 62 दहशतवादी मारले गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ही कारवाई केली आहे. 1971 च्या युद्धानंतर भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशनमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्त हल्ला केला. ही मोहीम फत्ते करणाऱ्या भारतीय लष्कराचं देशभरातून कौतुक होत आहे. तर दुसरीकडे राजकीय वर्तुळातून ही अनेक प्रतिक्रिया समोर येत असून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतं आहे.
भारतानं पाकिस्तानचं जेएफ 17 लढाऊ विमान पाडल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलानं पाडलेलं पाकिस्तानी लढाऊ विमान हे पाकिस्तानी (चीनी जेएफ-17) लढाऊ विमान आहे. लष्करानं काश्मीरच्या पंपोर भागात पाकिस्तानचं जेएफ 17 पाडलं. पाकिस्ताननं चीनकडून घेतलेलं जेएफ 17 विमान काश्मीरच्या पंपोर भागात पाडलं गेल्याची माहिती मिळत आहे. चिनी जेएफ-17 थंडर हे चीन आणि पाकिस्ताननं संयुक्तपणे विकसित केलेलं एक हलकं, सिंगल-इंजिन मल्टी-रोल फायटर जेट आहे. याच्या पहिल्या प्रोटोटाईपनं 2003 मध्ये उड्डाण घेतलेलं. हे पाकिस्तानी एअर फोर्सचं मुख्य लढाऊ विमान असल्याची माहिती मिळत आहे.
🟥भारताने या कारवाईद्वारे दहशतवाद्यांना स्पष्ट संदेश दिला आहे. तो संदेश असा आहे की, “दहशतवादी कुठेही लपले तरी, भारत त्यांना शोधून मारणार.” ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या धैर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. या कारवाईमुळे भारताची प्रतिमा जगात आणखी उंचावली आहे. भारतीय वायुसेनेने दाखवून दिले आहे की, ते आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या कारवाईमुळे देशातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे फक्त एक लष्करी कारवाई नाही, तर दहशतवादाविरुद्धच्या लढाईतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या कारवाईमुळे भारताने जगाला दाखवून दिले आहे की, तो दहशतवादाला कधीही सहन करणार नाही.
