🟥मुंबई, ठाणेसह कल्याण, डोंबिवली, वसई, विरार परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला.
🔴मॉक ड्रिलआधी हालचालींना वेग.- अजित डोवाल यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट.- ४८ तासांत दुसऱ्यांदा खलबतं.
🟥अखेर भारत-पाकिस्तान युद्धाची तारीख ठरली.- या’ दिवशी होणार पहिला हल्ला.
मुंबई :- प्रतिनिधी.
मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. ऐन मे महिन्यात पाऊस कोसळल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या या पावसाचा फटका मुंबई लोकलला बसला आहे.
मुंबईतील अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने सुरु आहे. तब्बल 20 ते 25 मिनिटे लोकल सेवा उशिराने सुरु आहे. सीएसएमटीहून ते कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाला आहे. मध्य रेल्वेला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोरदार वाऱ्यामुळे ओव्हरहेड वायर्समध्ये समस्या येत असल्याने गाड्या उशिराने धावत आहेत. हार्बर लाईनवर गाड्या ५ ते ७ मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने एक नवीन इशारा जारी केला आहे. पुढील ३ ते ४ तासांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
🟥यासोबतच गडगडाटी वादळ आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने नागरिकांना बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली आणि दहिसर भागात जोरदार वाऱ्यासह हलक्या सरी कोसळताना दिसत आहे. तसेच सायन, कुर्ला आणि चुनाभट्टी परिसरातही रिमझिम पाऊस पडताना दिसत आहे. ठाण्यातही सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. ऐन मे महिन्यातच पाऊस कोसळल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या राज्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असल्याने ठाणेकर उकाड्याने हैराण झाले होते. आता या पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

🔴मॉक ड्रिलआधी हालचालींना वेग.- अजित डोवाल यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट.- ४८ तासांत दुसऱ्यांदा खलबतं
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. राजधानी दिल्लीमध्ये सध्या हालचालींना वेग आला आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पीएम मोदी यांची भेट घेतली. गेल्या ४८ तासांत ही त्यांची दुसरी भेट आहे. पाकिस्तानसोबतच्या तणावपूर्व परिस्थितीमध्ये ही खूपच महत्वाची बैठक असल्याचे म्हटले जात आहे. भारत सरकारने ७ मे रोजी देशभरातील सर्वच शहरांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत. १९९७ नंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आला आहे.
🔴अजित डोवाल यांच्याव्यतिरिक्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान तसंच तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांनी आतापर्यंत अनेक वेळा पीएम नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. सध्या बैठकांवर बैठका सुरू आहे. या बैठकांमुळे हालचालींना वेग आला असल्याचे म्हटले जात आहे. या सर्व वेगवान हालचालींवरून असा अंदाज बांधला जात आहे की, पाकिस्तानविरोधात भारत कठोर कारवाई करू शकतो. तर दुसरीकडे, पाकिस्तान देखील भारत कारवाई करेल यामुळे घाबरला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यासह पाकिस्तानचे अनेक नेते सतत सतर्क आहेत.
🟥ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा सांगितले की, भारत कधीही नियंत्रण रेषेवर हल्ला करू शकतो. एवढंच नाही तर पाकिस्तानने आता आयएसआय प्रमुख असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली. भारताने पाकिस्तानविरोधात राजकीय कारवाई देखील केली आहे. ब्रिटन, जर्मनी, फ्रान्ससह अनेक देशांच्या राजदूतांना बोलावून भारताने पहलगाम दहशतवादी हल्ला कुणी केला आणि त्यासाठी काय तयारी केली आहे हे त्यांना सांगितले. ऐवढंच नाही तर जेव्हा पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा तिथेही पाकिस्तानला टोमणे मारले गेले. कोणत्याही सदस्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही.
🟥अखेर भारत-पाकिस्तान युद्धाची तारीख ठरली.- या’ दिवशी होणार पहिला हल्ला.
नवी दिल्ली.- वृत्तसंस्था
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला आहे.हल्ल्यानंतरही पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन कऱण्यात येत आहे. तर भारताकडूनही सिंधू पाणी करार पुढे ढकलण्यात आला आहे. राजनैतिक संबंध तोडण्यात आले आहेत. व्यवसाय आणि टपाल सेवा बंद करण्यात आल्या आहेत. पण या सर्व गोष्टींही ट्रेलरच्या स्वरूपात पाहिल्या जात आहे. पण भारताकडून पाकिस्तानवर अजून कोणताही मोठा हल्ला झालेला नाही. पण पंतप्रधान मोदींनी लष्कराच्या हाती चावी सोपवली आहे. भारताचा आक्रमक दृष्टिकोन आणि पाकिस्तानच्या कृती पाहता युद्ध निश्चित मानले जाते.
भारताची तयारी पाहता भारत पाकिस्तानवर हल्ला कऱण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानात बसलेल्या लोकांनाही हे माहित आहे. भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी अलिकडेच हे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, रशियातील विजय दिनानंतर भारत कदाचित १०-११ मे रोजी पाकिस्तानवर हल्ला करेल.
रशिया ९ मे हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करतो. पंतप्रधान मोदी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे त्यांनी ही भेट रद्द केल्याचे मानले जाते. त्यांच्या जागी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जाणार होते, पण तेही जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या जाही संरक्षण सचिवांच्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अब्दुल बासित यांच्या विधानाव्यतिरिक्त, भारताच्या तयारीवरून असेही सूचित होते की भारत १० किंवा ११ मे रोजी पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. प्रत्यक्षात, ७ मे रोजी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित केले जाईल. यामध्ये नागरिकांना युद्धादरम्यान स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जाईल. लोकांना जागरूक केले जाईल. या सरावादरम्यान सायरन देखील वाजवला जाईल आणि १९७१ नंतर हे पहिल्यांदाच घडणार आहे.
भारत कधीही काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर लष्करी हल्ला करू शकतो, अशी भिती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी वर्तवली आहे. तसेच, नवी दिल्लीला योग्य उत्तर दिले जाईल, असही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धापूर्वी अशा प्रकारची मॉक ड्रिल शेवटची आयोजित करण्यात आली होती. ही ड्रिल झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले होते. त्यानंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली आणि ३ डिसेंबर रोजी युद्ध सुरू झाले.
मॉक ड्रिलपूर्वी, हवाई दलाने उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेवर एक सराव सराव केला, ज्यामध्ये लढाऊ विमानांनी त्यांची ताकद दाखवली. गेल्या शुक्रवारी, हवाई दलाने एक्सप्रेसवेवर दोन टप्प्यात अभूतपूर्व लष्करी सराव केला. यामध्ये, दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी उड्डाण, लँडिंग, टेक-ऑफ आणि कमी उंचीवरील फ्लाय-पास्ट यासारख्या लढाऊ तंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. रात्री ९ ते १० च्या दरम्यान झालेले रात्रीचे लँडिंग हे सरावाचे मुख्य आकर्षण होते आणि भारतीय हवाई दलाच्या अत्याधुनिक क्षमता सिद्ध करून दाखवल्या.