Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रपाणी व आरोग्य प्रश्नावर शिवसेना आक्रमक.- आजरा तहसील दालनात बैठक संपन्न.( उपविभागीय...

पाणी व आरोग्य प्रश्नावर शिवसेना आक्रमक.- आजरा तहसील दालनात बैठक संपन्न.( उपविभागीय अधिकारी यांचे.- मुख्याधिकारी आदेश. )🛑आजरा साखर चेअरमन, संचालक, शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री श्री पवार यांची घेतली सदिच्छा भेट.

🛑पाणी व आरोग्य प्रश्नावर शिवसेना आक्रमक.- आजरा तहसील दालनात बैठक संपन्न.
( उपविभागीय अधिकारी यांचे.- मुख्याधिकारी आदेश. )
🛑आजरा साखर चेअरमन, संचालक, शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री श्री पवार यांची घेतली सदिच्छा भेट.

आजरा.- प्रतिनिधी

oplus_131074

महाराष्ट्र शासनाने गेली एक वर्षे प्रत्येक तालुक्यात हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नावाने सरकारी दवाखाना सुरु केला ज्यामुळे ग्रामीण भागतील नागरीकांना आरोग्याची मोफत सुविधा मिळावी पण आजरा शहरात सुरु केलेला दवाखान्यात अजुनही डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोणत्याही रुग्णांना उपचार मिळत नाहीत. एवढा खर्च करुन शिवसेना प्रमुख बाळासाहेबाच्या नावाने चालु केलेल्या दवाखान्यात रुग्णांना डॉक्टर नसल्यामुळे उपचार मिळत नाहीत. ही अत्यंत दुर्देवी बाब आहे.

ज्या बाळासाहेबांनी अखंड आयुष्य या महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी खर्ची घातले त्यांच्या नावाने सुरु केलेल्या दवाखान्यात सेवा मिळत नाही ही गंभीर बाब आहे. त्यामुळे तात्काळ त्या दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध करुन रुग्नांना दिलासा द्यावा. अन्यथा आपल्या कार्यालयावर मोर्चा काढणेत येईल याबाबत शिवसेना उबाठा आजरा वतीने निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज दि. २ रोजी आजरा तहसील कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी हरिश सुळसो, तहसीलदार समीर माने, आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे समवेत शिवसेना व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची तहसीलदार कार्यालयाच्या दालनात बैठक संपन्न झाली.

बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी आजरा शहरातील व तालुक्यातील विविध आरोग्याच्या समस्या स्वच्छ व मुबलक पाणी प्रश्नावर व प्रशासनाचे दुर्लक्ष याबाबतची भूमिका मांडली. यामध्ये आजरा शहरांमध्ये दूषित पाण्यामुळे कावीळ सारखे रोग होत आहेत. त्याच्यात टेस्ट करण्यासाठी खाजगी दवाखान्यात हजारो रुपये गोरगरीब जनतेला मोजावे लागत आहेत. आजरा शहरात सी. डी. फार्म येथील गटारीचे पाणी हे नदीला सोडले आहे. यामुळे पुढील बोलकेवाडी हात्तीवडे सह अनेक गावांना त्या नदीचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. असे असताना नगरपंचायतने गटरीचे पाणी नदीमध्ये सोडले कसे याकडे त्यांनी कानाडोळा का केला. असा प्रश्न संभाजी पाटील यांनी उपस्थित केला याबाबत मुख्याधिकारी श्री सुर्वे यांनी सदर जाणारे गटरीचे पाणी थांबून तिथून स्वच्छ पाण्याचा निचरा व्हावा अशा पद्धतीने मातीचा बांध घातला आहे. तरीदेखील त्या ठिकाणी मोठा शोष खड्डा मारून सदर पाणी साचवले जाईल असे सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले आपण पाणी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे साथीचे रोग पसरत आहेत यामुळे आपण याकडे कानाडोळा करू नये. असे सांगितले. तर यामध्ये आजरा शहरातील काही सलून दुकानदार आपल्या दुकानातील केसांचा कचरा घंटागाडी येत असताना देखील लेंडहोळ मध्ये फेकून देतात त्यांना तात्काळ नोटीस देण्यात येणार आहे. लेंडहोळ मध्ये केसाचा कचरा सापडल्यास कारवाई करण्यात येईल याबाबत मुख्याधिकारी श्री सुर्वे यांनी या विषयाबाबत लवकरच नोटीस दिल्या जाणार आहेत असे सांगितले.


उपविभागीय अधिकारी श्री . सुळ यांनी आरोग्याच्या प्रश्नाकडे नगरपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. पाण्यामुळे जे संसर्गजन्य रोग होतात यामुळे पाण्याची योग्य ती तपासणी होऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी. असा सूचना नगरपंचायत ला दिल्या. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शिवाजी आढाव, युवा सेनेचे महेश पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक किरण कांबळे, तसेच रवींद्र भाटले, विक्रम देसाई सह शिवसेना युवा सेना महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपतालुकाप्रमुख संजय येसादे यांनी आभार मानले.‌

🛑वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मुंकुंदराव देसाई व संचालक मंडळ यांची राज्याचे उपमुख्यमंत्री तत्था अर्थमंत्री नाम. अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट.

आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेवून कारखान्याच्या शासन दरबारी असलेल्या अडचणीबाबत निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने कारखाना उभारणी काळात महाराष्ट्र शासनाकडून प्रकल्प दुरावा कर्जापोटी रु.300.00 लाख प्राप्त झाले होते. सदर कर्जाच्या परतफेडीसाठी कारखान्याने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार विकी पोत्यांवर रू.25/- प्रमाणे तसेच एन.सी.डी.सी.चे मंजुर कर्जातुन उपलब्ध झालेली रक्कम अशी शासकीय कर्जाची पुर्ण रक्कम शासनाकडे जमा केलेली आहे. तथापी सदर कर्जावर शासनाने आकारलेले व्याज रू.1212.75 लाख कारखान्याचे आर्थिक अडचणीमुळे सदरची व्याजाची रक्कम भरणे फारच अडचण झालेली आहे. वरीलप्रमाणे कर्जाच्या व्याजाची रक्कम राज्य सरकारने माफ करावी. त्याचबरोबर प्रकल्प उभारणी करीता रू.1062.50 लाख शासकीय भाग भांडवल दिले होते. सदर रक्कमेपैकी रू.453.25 लाख इतकी रक्कम शासनास परतफेड केली असुन आजअखेर रू.609.25 लाख इतकी थकबाकी राहिलेली आहे. भाग भांडवलापैकी अद्याप देय असलेली रक्कम रू.609.25 लाख भागविणेसाठी 5 वर्षे विलंबावधी देवून पुढील 15 वर्षाच्या कालावधीसाठी समान हप्त्यात परतफेड करणेस मुदतवाढ देवून सहकार्य करणेत यावे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. वरील केलेल्या मागणी बाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी वरील दोन्ही मागण्यांचा सकारात्मक विचार करून आपल्या कारखान्याच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी वैद्यकिय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, माजी आमदार के.पी. पाटील, राजेश पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई, माजी अध्यक्ष वसंतराव धुरे, उदयसिंह पोवार, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधीर देसाई, माजी व्हा. चेअरमन मधुकर देसाई, मारूती घोरपडे, संचालक अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, कार्यकारी संचालक, संभाजी सावंत, सेक्रेटरी व्यंकटेश ज्योती, डे. चिफ अकौंटंट श्री. रमेश वांगणेकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.