Home कोंकण - ठाणे मोठं काहीतरी घडतंय- संरक्षणमंत्री आधी लष्करप्रमुखांना भेटले नंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी...

मोठं काहीतरी घडतंय- संरक्षणमंत्री आधी लष्करप्रमुखांना भेटले नंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केली चर्चा.🛑पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र अलर्ट.- महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय.

Oplus_131072

🟥मोठं काहीतरी घडतंय- संरक्षणमंत्री आधी लष्करप्रमुखांना भेटले नंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केली चर्चा.
🛑पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र अलर्ट.- महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय.

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणाव कमालीचा वाढला आहे. या दोन देशांमध्ये मोठं काहीतरी घडू शकतं, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सकाळीच लष्करप्रमुखांशी चर्चा केली. त्यानंतर ते थेट लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे त्यांनी नरेंद्र मोदींशी चर्चा केली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना पहलगाम हल्ल्यानंतरची परिस्थिती आणि लष्कराच्या मोहिमेबाबत माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. राजनाथ सिंह आणि पंतप्रधान मोदी यांच्यात जवळपास ४० मिनिटे सखोल चर्चा झाली. राजनाथ सिंह यांनी मोदी यांच्याशी चर्चा केली. पहलगाम हल्ल्यानंतर तेथे सुरू असलेली मोहीम आणि सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली. त्याआधी सोमवारी सकाळीच संरक्षण मंत्री साउथ ब्लॉकला गेले होते. तेथे त्यांना लष्करप्रमुखांनी लष्कराच्या मोहिमेची माहिती विस्तृतपणे दिली. पहलगाम हल्ल्यानंतर सर्व स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसते. हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर काही तासांतच केंद्र सरकारने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधु जल कराराला स्थगिती दिली. तसेच, भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात जाण्याचे आदेश दिले. दुसरीकडे, मोठं काही तरी घडणार आहे, अशी चर्चा जगभरात सुरू झाली आहे. भारताकडून दहशतवाद्यांना मोठा तडाखा दिला जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दिल्लीपासून सीमाभागापर्यंत सर्व यंत्रणा हायअलर्टवर आहेत.

🛑पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र अलर्ट.- महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय.
पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांची माहिती

मुंबई :- प्रतिनिधी

पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

राज्यातील पर्यटन स्थळे, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांची माहिती पुरविणे हा या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश असणार आहे. १ ते ४ मे, २०२५ दरम्यान पार पडणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महोत्सवात ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे, असे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई म्हणाले. राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, तसेच राज्यातील संस्कृती, इतिहास, पर्यटनस्थळे, कायदा, नियम, पर्यटनाविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलिसांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे.यासाठी राज्य सुरक्षा मंडळाने व मेस्कोने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश पर्यटन विभागाने दिले आहेत. ‘पर्यटन पोलीस’ या संकल्पनेमुळे पर्यटन स्थळावरील शाश्वत पर्यटन पद्धती टिकवून ठेवण्यासाठी व शाश्वत पर्यटनच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतील, असे देसाई म्हणाले. पर्यटन सुरक्षा दलाच्या नव्याने सुरूवातीमुळे राज्यातील पर्यटनाला नवसंजीवनी मिळेल. हे दल पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात असेल, ज्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांचा विश्वास वाढेल. स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. दलातील कर्मचारी विशेष प्रशिक्षण घेतील, जेणेकरून ते पर्यटकांना मार्गदर्शन आणि संरक्षण देऊ शकतील. पर्यटन स्थळांवर सीसीटीव्ही, हेल्पलाईन आणि तत्काळ प्रतिसाद यंत्रणा यासारख्या सुविधा उपलब्ध होतील, असे मंत्री देसाई म्हणाले.

प्रधान सचिव अतुल पाटणे म्हणाले की, पर्यटकांसाठी सुरक्षाकवच निर्माण करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागाचे हे पाऊल अत्यंत सकारात्मक आहे. यामुळे पर्यटनस्थळांवर विश्वासार्ह वातावरण निर्माण होईल. तसेच पर्यटकांचा पर्यटनाकडे ओघ वाढेल आणि स्थानिक समुदायांना आर्थिक लाभ मिळेल. दलामध्ये प्रशिक्षित कर्मचारी, आधुनिक तंत्रज्ञान आणि समन्वित यंत्रणा असेल, जी आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कारवाई करेल. पर्यटकांसाठी हेल्पलाइन, माहिती केंद्र आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सुलभ सेवा उपलब्ध होतील. याशिवाय, स्थानिक पोलिस आणि प्रशासनाशी समन्वय साधून सुरक्षा व्यवस्था बळकट केली जाईल. पर्यटन विभाग पर्यटकांच्या गरजा समजून त्यांच्या अपेक्षांनुसार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्र पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणखी मजबूत होईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.