🟥पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताचे प्रत्युत्तर.-सिंधू नदी पाणी करार रद्द- तर पाक दूतावासाला ठोकणार टाळे.
🟥माझं आयुष्य पूर्ण खराब झालंय, मी पोरकी झाले, माझ्या माणसाचा चेहराही पाहू शकत नाही.- नेते शरद पवारांसमोरच संतोष जगदाळेंच्या पत्नीला भावना अनावर.
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. शत्रू देशाचा भारतातील दूतावासाला टाळे ठोकण्यात येणार आहे.पाकिस्तानच्या राजदुतांसह त्यांच्या सर्व अधिका-यांना भारत सोडण्यसाठी फक्त 48 तासांचा कालावधी दिला गेला आहे. शिवाय, सिंधू पाणी करार रद्द करण्याची घोषणाही करण्यात आली आहे, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये पाणी संकट निर्माण होऊ शकते. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीएस बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी रात्री पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
🟥मिस्री म्हणाले, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू नदी पाणी करार स्थगित करण्यात आला आहे. अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे. यासोबतच पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा बंद करण्यात आले आहेत. यासोबतच पाकिस्तानमधील भारतीय दूतावास बंद करण्यात आला आहे आणि पाकिस्तानी राजदूतांना भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे.
सिंधू पाणी करार हा दोन्ही देशांमध्ये 1960 पासून अस्तित्वात आहे. पहलगाम दशतवादी हल्ल्यानंतर घेण्यात भारताने थेट सिंधू पाणी करार रद्दची घोषणा केली आहे. हा पाकिस्तानसाठी झटका धक्का आहे. पाणीटंचाईमुळे ते गुडघे टेकू शकतात. सिंधू पाणी करार रद्द झाल्याने पाकिस्तानला भविष्यात जलसंकट, अन्नसंकट, आर्थिक मंदी, सार्वजनिक आरोग्य समस्या आणि राजकीय-आंतरराष्ट्रीय तणाव हे सर्व एकत्रितपणे भेडसावू शकतात.
🔴सिंधू पाणी करार (इंडस वॉटर ट्रीटी) रद्द झाल्यास पाकिस्तानवर येणारे संभाव्य परिणाम खालीलप्रमाणे असू शकतात:-
सिंधू, झेलम आणि चेनाब नद्यांच्या पाणीसाठी पाकिस्तान पूर्णतः भारतावर अवलंबून आहे. करार रद्द झाल्यामुळे भारत या नद्यांचा प्रवाह कमी अथवा पूर्णतः रोखू शकते, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची कमतरता भासू शकते.
🟣शेतीवर गंभीर परिणाम
पाकिस्तानमध्ये शेतीतील सुमारे 70-80% सिंचन या पश्चिम नद्यांवर अवलंबून आहे. पाणीपुरवठा कमी झाल्यास धान्य, कापूस आणि गहू यांसह इतर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटेल. यामुळे धान्य टंचाई आणि आर्थिक संकट निर्माण होऊ शकते.शेतीविकासपेक्षा सुमारे 20-25% पाकिस्तानचा GDP थेट शेतीवर अवलंबून आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे शेतीतील उत्पन्न घटल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडणार आहे, बेरोजगारी वाढेल आणि देशाच्या समग्र आर्थिक वाढीत मोठा घट येईल.
🟥राजकीय-आंतरराष्ट्रीय तणाव
सिंधू पाणी करार करार रद्द होणे हे दोन देशांमधील भरीव राजकीय तणाव वाढवू शकते. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मंचावर मदतीसाठी थांबेल, तर भारत-पाक संबंध आणखी ताणले जातील.तर पाण्याच्या मर्यादित स्रोतांसाठी स्थानिक पातळीवर संघर्ष आणि नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रणासाठी झपाटलेले वाद वाढू शकतात, ज्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो.
🟥माझं आयुष्य पूर्ण खराब झालंय, मी पोरकी झाले, माझ्या माणसाचा चेहराही पाहू शकत नाही.- नेते शरद पवारांसमोरच संतोष जगदाळेंच्या पत्नीला भावना अनावर.
पुणे :- प्रतिनिधी

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी जगदाळे कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. आज माझं आयुष्य पूर्ण खराब झालंय, मी माझ्या माणसाला उघडून बघू शकत नाही, अशा शब्दात संतोष जगदाळेंच्या पत्नीने भावनांना वाट मोकळी करुन दिली. त्यांनी आमच्या माणसांना जशा गोळ्या घातल्या, तशा त्यांना मारा आणि आम्हाला दाखवा, अशी मागणीही यावेळी जगदाळेंच्या पत्नीने शरद पवारांसमोर केली.
ते मास्क लावून आले होते. शेर आला शेर आला म्हणून पळून गेले. तिकडे कुणीच नव्हते, अधिकारी किंवा सुरक्षा रक्षक असणं गरजेचं होतं, उपचारासाठी दिरंगाई झाली. आम्हाला काहीच सांगितलं नाही, जिवंत आहेत जिवंत आहेत, असं सांगत होते. त्यांनी तिथल्या एका घोडेवाल्याला पण मारलं, कारण तो प्रतिकार करत होता, की तुम्ही या लोकांना नका मारु, असं प्रगती जगदाळे सांगत होत्या. लोकांचे जीव धोक्यात घालू नका, लोकांचं आयु्ष्य उद्ध्वस्त होऊन जातं, मी कुठे बघणार आहे तुम्ही मला सांगा, आयुष्यभरासाठी पोरकी झाले मी, माझा नवरा माझ्या बरोबर नाहीये, या लेकरांनी काय करायचं? असा हताश प्रश्न त्यांनी विचारला.
तिथली लोकल लोकंही रडली आमच्यासाठी, त्यांना वाईट वाटलं, कारण त्यांचं सगळं पर्यटकांवर चाललंय आणि यांनी टुरिस्टवरच हल्ला केला, तिथले ऑफिसरसुद्धा रडले आमच्यासाठी, त्यांना वाईट वाटलं की काय होऊन बसलं, यांचा तुम्ही कायमचा बंदोबस्त करा, २७ कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, अशा भावना प्रगती जगदाळे यांनी व्यक्त केल्या. आज माझं आयुष्य पूर्ण खराब झालंय, मी माझ्या माणसाला उघडून बघू शकत नाही, कालपासून मला त्याचा चेहरा दिसला नाही, तिथेही आम्हाला दाखवलं नाही त्यांनी, असं सांगताना जगदाळेंच्या पत्नीला शोक अनावर झाला. त्या दहशतवाद्यांना मारा आणि आम्हाला दाखवा. तशाच गोळ्या घाला, जशी त्यांनी डोकी फोडली, रक्त काढलं, त्याने थेट गोळ्या घातल्या, काही विचारलं देखील नाही. लहान लहान मुलांसमोर त्यांच्या वडिलांना गोळ्या घातल्या. ती रडत होती आमच्यासमोर, सगळा आक्रोश चालू होता, आम्ही एकमेकांना काय सांगू कळत नव्हतं, आम्ही चिखलात पडलो, मला उभं राहता येत नव्हतं, पहिलाच दिवस होता फिरण्याचा, असंही प्रगती जगदाळे यांनी शरद पवार यांना सांगितले.